मोठ्या संघर्षाने आणि मोठ्या मेहनतीने बॉलिवूडमध्ये एक प्रतिभावान अभिनेता म्हणून ओळख मिळवलेला नवाजुद्दीन सिद्दीकी आज (१९ मे ) त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. यावर्षीचा त्याचा वाढदिवस नक्कीच खास असून पहिल्यांदा नवाज कान्स फेस्टिव्हलमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. उत्तरप्रदेशमधल्या अगदी छोट्याशा गावातून मुंबईत येत नवाजुद्दीनने स्वबळावर तिचे करिअर बनवले आणि आज तो परदेशात भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. आपल्या करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी नवाजने मोठी मेहनत केली आहे. त्याला उशिरा का होईना पण त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि तो यशस्वी झाला. एकेकाळी जेवणासाठी तरसणारा नवाज आज कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया नवाजच्या संपत्तीबद्दल.
आलिशान जीवनशैलीचा चाहता असणारा नवाजुद्दीन सिद्दीकीने आपल्या मेहनतीच्या जोरावर त्याचे सर्व स्वप्न सत्यात उतरवले. मीडियामधील रिपोर्टनुसार नवाजुद्दीनकडे एकूण ९६ कोटींची संपत्ती असून, त्याची चित्रपट, वेबसिरीज, जाहिराती आदींमधून कमाई होते. काही महिन्यांपूर्वीच त्याने त्याचे स्वप्नातील घर खरेदी केले. यारी रोड या बंगल्याला सजवण्यासाठी त्याने ३ वर्ष लावले. याशिवाय त्याच्याकडे मर्सिडीज बेंज, बीएमडब्ल्यू आणि ऑडी आदी अनेक आलिशान गाड्यादेखील आहेत. यासर्व गाड्यांच्या किंमती कोटींमध्ये आहे. नवाज लवकरच ‘टीकू वेड्स शेरू’ या चित्रपटात दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा