Friday, April 19, 2024

तर ‘या’ कारणासाठी बिग बॉस ओटीटी विजेत्या दिव्या अग्रवालने खतरो के खिलाडी शोसाठी दिला नकार

लवकरच सर्वांचा लाडका असा ‘खतरो के खिलाडी’ हा शो नव्या रूपात आणि नव्या स्पर्धकांसह पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. या शोच्या निमित्ताने परत सर्वांना रोहित शेट्टीचे खुमासदार सूत्रसंचालन आणि त्याची स्टाईल पाहायला मिळणार आहे. मागील अनेक दिवसांपासून या शोच्या बातम्या येत आहे. अनेक कलाकारांना या शोसाठी विचारणा झाली असून, काहींनी शोसाठी होकार दिला आहे तर काहींनी नकार दिला आहे. बिग बॉस ओटीटीची विजेती असणारी अभिनेत्री मॉडेल दिव्या अग्रवालला देखील या शोची ऑफर देण्यात आली होती, मात्र तिने यासाठी नकार दिला आहे. आता दिव्याने तिने शोसाठी का नकार दिला याचे कारण सांगितले आहे.

बिग बॉस ओटीटी जिंकल्यानंतर दिव्या रातोरात चर्चेत आली आणि प्रसिद्ध झाली. या शोनंतर तिच्याकडे कामासाठी अक्षरशः रंग लागली आहे. याक्षणी तिच्याकडे कामाची कोणतीच कमतरता नाही. एका मुलाखतीदरम्यान तिने सांगितले की, तिला अशा रियॅलिटी शोची खूपच भीती वाटते. मात्र जर संधी मिळाली तर ती नक्कीच याबद्दल विचार करेल. सध्याच्या मीडियामधील बातम्यांनुसार दिव्या या शोचा हिस्सा नसणार आहे. तिने तिच्या व्यस्त वेळापत्रकामुळे खतरो के खिलाडी शोला नकार दिला आहे. रिपोर्ट्सनुसार तिचा साहसी अंदाज पाहूनच निर्मात्यांनी तिला या शोची ऑफर दिली होती. मात्र तारखांची जुळवाजुळव न झाल्याने दिव्याने शोला नकार दिला. अजूनही तिचा शोसाठी तारखा काढण्याचा प्रयत्न चालू आहे. मात्र आता जवळपास ती या पर्वाचा हिस्सा नसल्याचे मानले जात आहे.

काही दिवसांपूर्वीच ती करण कुंद्रासोबत ‘बेचारी’ गाण्यात दिसली होती. आतापर्यंत या शोसाठी शिवांगी जोशी, सृति झा, रुबीना दिलैक, तुषार कालसिया, राजीव अदातिया, प्रतीक सहजपाल आणि मोहित मलिक यांना फायनल करण्यात आले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा