Saturday, December 21, 2024
[aioseo_breadcrumbs]

नवाजुद्दीन सिद्धीकीच्या नोकरणीने साक्ष बदलवताच भावाने साधला निशाणा म्हणाला, ‘अजून कितींना विकत घेणार?’

बॉलिवूडमधील प्रतिभावान अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकी सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. नवाज आणि त्याची पत्नी आलिया यांच्यामध्ये सुरु असलेला वाद आता चांगलाच विकोपाला गेला आहे. यात त्याच्या पत्नीने त्याच्यावर अनेक मोठे आणि गंभीर आरोप केले आहेत. यात आता भरीस भर म्हणून नवाजुद्दीन सिद्धीकीच्या घरात काम करणाऱ्या स्त्रीचे देखील एक प्रकरण समोर आले आहे. यामध्ये नवाजुद्दीनचा भाऊ असणाऱ्या शमासने सपनाबद्दल एक ट्विट केले. ज्यात सपनाने नावाजवर अनेक आरोप केले, मात्र नंतर ते आरोप परत घेतले.

नवाजुद्दीन आणि शमास यांच्यात मागील अनेक दिवसांपासून मतभेद चालू आहे. मात्र आता सपनाने तिची साक्ष बदलामुळे शमासने नावाजवर निशाणा साधला आहे. शमासने ट्विट करत नावाजवर सपनाला पैसे देऊन साक्ष बदलवण्याचा आरोप लावला आहे. त्याने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले, “हे सर्व स्क्रिप्टेड आहे. किती लोकांना विकत घेणार? बँक बॅलन्स संपून नको जायला. आता तर तुला काम देखील जास्त मिळत नाही. थांबलेल्या चित्रपटांमुळे बॉलिवूडचे १५० कोटी अडकले आहेत. बरोबर आहे. भंगारवाला, बकऱ्या विकणारच याला देखील हाकलत हाकलत नरकात घेऊन जाईल.”

नवाजुद्दीनच्या घरी काम करणारी सपना रॉबिन मसीह दुबईमध्ये वाईट अवस्थेत होती. नवाजच्या मॅनेजरने तिला तिच्या साक्षीतून नावाजचे नाव काढण्याची धमकी दिली. त्यानंतर सपनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करत तिने सांगितले की, नवाजच्या टीमने तिच्याशी संपर्क साधत तिला तिचा पगार देत पुन्हा दुबईहून भारतात आणणार असल्याचे सांगितले आहे.

मागील बऱ्याच काळापासून नवाजुद्दीन सिद्धीकीचा त्याची पत्नी आणि भावासोबत वाद चालू आहे. इंडस्ट्रीमध्ये देखील ही बाब सर्वाना माहित आहे. काही वर्ष आधी शमासने नवाजचे काम पाहून त्याचा ‘बोले चुडिया’ सिनेमाचे दिग्दर्शन देखील केले. मात्र सिनेमाच्या प्रदर्शनाआधीच दोघे भावांमध्ये वाद निर्माण झाला. तर नवाजच्या पत्नीने देखील त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘…तुम्हाला त्याचा राग येता कामा नये’ गीतकार जावेद अख्तर यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन लोकांना दाखवला आरसा

अनवाणी पायांनी ऑस्कर पुरस्कारासाठी रवाना झाला राम चरण, काय आहे कारण? घ्या जाणून…

हे देखील वाचा