Wednesday, June 26, 2024

खूप सुंदर! बापाच्याच गाण्यावर थिरकली मुलगी, नवाजुद्दीन सिद्दीकीने शेअर केला मुलीचा डान्स व्हिडिओ

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतो. तो सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. त्याचा ‘बारिश की जाए’ हा म्युझिक अल्बम नुकताच रिलीझ झाला आहे. यामध्ये नवाजुद्दीन डान्स करताना दिसत आहे. त्याच्या याच गाण्यावर त्याची मुलगी शोरा हिने देखील एक डान्स व्हिडिओ बनवला आहे. मुलीचा हा व्हिडिओ त्याने सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. नवाजुद्दीनच्या मुलीच्या या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप लाईक्स मिळत आहेत. त्याचे चाहते या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया देताना दिसत आहे.

नवाजुद्दीनने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याची मुलगी शोरा ही घरात डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करून नवाजुद्दीनने लिहिले आहे की, “मी केलेल्या डान्सपेक्षा शोराने खूप चांगला डान्स केला आहे.” तिच्या या व्हिडिओला त्याच्या चाहत्यांनी खूप पसंती दर्शवली आहे.

शोराच्या‌ या डान्सचा अंदाज आपण इथूनच लावू शकतो की, या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स मिळाले आहेत. नवाजुद्दीनच्या मुलीच्या व्हिडिओला सगळेजण खूप प्रेम देत आहेत. तसेच तिचे कौतुक देखील करत आहेत. तसेच अनेकांनी ‘शोरा खूप सुंदर आहे,’ अशी कमेंट देखील केली आहे.

‘बारिश की जाये’ हा नवाजुद्दीनचा पहिला म्युझिक अल्बम आहे. या म्युझिक व्हिडिओमध्ये तो सुनंदा शर्मा हिच्या सोबत दिसला आहे. हे गाणे बी प्राकने गायले आहे. तसेच प्रसिद्ध लिरिक्स रायटर जानी यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकीने ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘गँग ऑफ वासेपुर’, ‘रमण राघव 2.0’, ‘लंचबॉक्स’, ‘सरफरोश’ , या चित्रपटात काम केले आहे. सोबतच त्याने ‘परदेसी कहते हैं’ या टीव्ही मालिकेत देखील काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जोडप्याच्या ‘बारिश की जाए’ गाण्यावरील डान्सने जिंकले सर्वांचे मन, गायक बी प्राकने शेअर केला जबराट व्हिडिओ

-नाचा रे! वडील कमल हासन यांच्या निवडणूक प्रचारासाठी अभिनेत्रीने लावले ढोल- ताशावर ठुमके, पाहा जबरदस्त डान्स व्हिडिओ

-‘मूर्खपणा शिगेला पोहोचला आहे’, मास्क न लावल्यामुळे टीव्ही कलाकारांनी सुनावले कंगना रणौतला खडेबोल

हे देखील वाचा