बॉलिवूडमधील आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर मोठं स्थान निर्माण करणारा प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी. सध्या अभिनेता चित्रपटामुळे नाही तर आपल्या वैयक्तीक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. त्याची पत्नी आलिया सिद्दीकी आणि त्याची आई मेहरुनिसा सिद्दीकी यांच्यामध्ये संपत्तीला घेऊन सतत वाद होताना पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी तर नावजच्या आईने सुनेविरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रारही नोंदवली होती. मात्र, अभिनेत्यावर आई आणि बायकोच्या भांडणामुळे आलिशान बंगला सोडून चक्क हॉटेलमध्ये राहाण्याची वेळ आली आहे. चला तर काय पूर्ण प्रकरण जाणून घेऊयात.
अगदी साध्या कुटुंबातून बॉलिवूडसारख्या इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर नवजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) आज कोट्यावदीचा मालक बनला आहे. मात्र. याच संपत्तीमुळे त्याची आई मेहरुनिसा सिद्दीकी (Mehroonisa Siddiqui) आणि पत्नी आलिया सिद्दीकी (Alia Siddiqui) यांच्यामध्ये जोरदार वाद सुरु आहेत. नवाजच्या आईने त्याची पत्नी आलियाला जबरदस्तीने घरात घुसल्यमुळे तिच्या विरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती.’त्यांचा आरोप होता की आलिया नवाजची बायको नाही.’ यानंतर आलियाने देखिल नवजाच्या कुटुंबियांवर कौटुंबिक अत्याचाराचा आरोप लावला होता. आता या दोघींमध्ये पुन्हा एकदा वाद झाला आहे, ज्यामुळे नवाज यांच्या भांडणाला कंटाळुन थेट हॉटेलमध्ये राहायाला गेला आहे.
View this post on Instagram
माध्यमातील वृत्तानुसार नवाजने सांगितले आहे की, जोपर्यत त्याचा वकील घरातील वादाचा मार्ग काढत नाहीत तोपर्यत अभिनेता हॉटेलमध्येच राहाणार आहे. सांगायचं झालं तर नवाजने नुकतंच मुंबई अंधेरीमध्ये स्वत:चा आलिशान बंगला बांधला आहे ज्याचं नाव आपल्या वडीलांच्या नवावर ठेवलं आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
काय सांगता! करण जोहरमुळे रोनित रॉयला नाकारावा लागला ऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाचा हॉलिवूड सिनेमा
रवीना टंडनने नेहमीच केले स्वतःच्या अटींवर काम, न आवडणाऱ्या छोट्या सीनसाठी देखील तिने नाकारले सिनेमे










