Monday, June 17, 2024

काय सांगता! करण जोहरमुळे रोनित रॉयला नाकारावा लागला ऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाचा हॉलिवूड सिनेमा

टेलिव्हिजन इंडस्ट्री ते बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने यश मिळवणारा अभिनेता म्हणजे रोनित रॉय. सध्या रोनित त्याच्या आगामी ‘शेहजादा’ सिनेमासाठी चर्चेत आहे. सिनेमात रोनित कारिक आर्यन आणि कृती सेनन यांच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन चालू आहे. यातच या सिनेमाची टीम कपिल शर्मा शोमध्ये पोहचली. या शोमध्ये रोनितने एक खुलासा केला की करण जोहरमुळे त्याच्या हातातून एक हॉलिवूड सिनेमा निसटला.

कपिल शर्मा शोमध्ये कपिल चर्चेदरम्यान रोनितला त्याच्या एका हॉलिवूड सिनेमाबद्दल विचारतो. त्याला ऑफर झालेल्या ‘जीरो डार्क थर्टी’ हा हॉलिवूड सिनेमा त्याला ‘स्टूडेंट ऑफ द ईयर’मुळे नव्हता करता आला हा काय किस्सा होता. त्यावर रोनित म्हणतो, “हो मला जीरो डार्क थर्टी हा हॉलिवूड सिनेमा ऑफर झाला होता, तेही ऑडिशन न घेता. त्यांनी मला सांगितले की, दिग्दर्शक कॅथ्रीन बिगेलो यांनी माझे काम पाहिले आणि त्यांची इच्छा आहे की मी हा सिनेमा करावा. मी हे ऐकून शॉक झालो. कारण ऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाला मी त्याच्या सिनेमासाठी पाहिजे. त्याचे वेळापत्रक आधीच तयार होते, आणि त्यांना माझ्या ज्या डेट पाहिजे होत्या त्या करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर साठी होत्या.”

पुढे रोनित म्हणाला, “मी करण जोहरच्या टीमसोबत डेट बदलवण्यासाठी विचारणा केली, कारण माझ्याकडे ही आलेली उत्तम संधी होती जी कधीतरी मिळते. मात्र त्यांनी नकार दिला. करणने नाही तर त्याच्या टीमकडून मला नकार आला. त्यामुळे मला तो सिनेमा नाकारावा लागला. मात्र नंतर मी करणला फोन केला शूटिंग कधी सुरु होते तेव्हा तो म्हणाला अजून वेळ आहे. तो माझ्यासाठी मोठा झटका होता. कारण हा सिनेमा वेळेत सुरु झाला नाही आणि हॉलीवूडचा सिनेमा देखील हातातून गेला.” रोनितने टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये मोठे काम केल्यानंतर तो बॉलिवूडमध्ये गेला. तिथे देखील मोठे यश मिळवले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
श्रीदेवी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने चीनमध्ये पुन्हा एकदा प्रदर्शित होणार त्यांचा ‘हा’ सुपरहिट सिनेमा
ऐश्वर्यावाला सुंदरतेमध्ये मात देणारी ‘सिर्फ तुम’ फेम अभिनेत्री आहे तरी कुठे? जाणून घ्याच

हे देखील वाचा