दक्षिण भारतातील सर्वात यशस्वी, लोकप्रिय आणि लेडी सुपरस्टार म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) आता तिच्या कमाईमुळे चर्चेत आली आहे. नयनताराचे नुकतेच लग्न झाले, त्यामुळे ती सतत चर्चेत असते. आता अभिनेत्रीच्या कमाईच्या रिपोर्टने चर्चा रंगवल्या आहेत. खरं कर, नयनतारा लवकरच तिच्या ७५व्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या चित्रपटासाठी अभिनेत्रीने भरमसाठ रक्कम घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
नयनताराने नीलेश कृष्णा दिग्दर्शित तिच्या पुढील चित्रपटासाठी सुमारे १० कोटी फी आकारली आहे. असे करून तिने कमाईच्या शर्यतीत साऊथची यशस्वी अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) हिला पराभूत केले आहे. तमिळ चित्रपटांची लेडी सुपरस्टार नयनतारा हिने २०२२ मध्ये तिच्या वैयक्तिक जीवनात, तसेच व्यवसायात यशाची शिखरे गाठली आहेत. जवळपास दोन दशकांपासून ती साऊथ सिनेमात काम करत आहे. नयनतारा आता तिच्या ७५व्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. तसेच ती लवकरच शाहरुख खानसोबत (Shahrukh Khan) बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. (nayanthara highest paid south actress charged 10 crore)
सध्या, नयनतारा दक्षिण भारतातील चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनली आहे. यात तिने समंथाचाही पराभव केला आहे. समंथाने अलीकडेच अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) ‘पुष्पा: द राइज’ चित्रपटातील ‘ऊ अंटवा’ या गाण्यासाठी ५ कोटी रुपये मानधन घेतले होते.
फिल्म इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्रीची ५ कोटी रुपये फी खूप जास्त मानली जाते. अशा परिस्थितीत, समंथाच्या फीची खूप चर्चा झाली. मात्र तिने तिच्या आगामी चित्रपटासाठी दुप्पट फी घेतली आहे. नयनताराने तिच्या ७५व्या चित्रपटासाठी १० कोटी रुपये शुल्क आकारले आहे. तिची स्टार पॉवर पाहून निर्मात्यांनाही नाही म्हणता आले नाही.
नयनताराच्या एकूण संपत्तीबद्दल सांगायचे झाले, तर ती केवळ चित्रपटांतूनच कमाई करत नाही. अभिनेत्री एक गुंतवणूकदार देखील आहे. ती राउडी पिक्चर्स प्रोडक्शन कंपनीची मालकिण आहे, जी ती तिचा पती विघ्नेश शिवनसोबत चालवते. नयनताराने ‘चाय वाला’, ‘द लिप बाम’ आणि सौदी अरेबियातील तेल कंपनीतही गुंतवणूक केली आहे. त्यामुळे ती चित्रपटांच्या दुनियेबाहेर अतिरिक्त पैसे कमावते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा