Thursday, April 18, 2024

क्या बात है! ‘जवान’नंतर नयनतारा “या” मोठ्या सुपरस्टारसोबत पहिल्यांदाच शेअर करणार स्क्रीन

दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील लेडी सुपरस्टार नयनतारा नेहमीच तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक कारणांमुळे लाइमलाईट्मधे असते. आधी लग्न, मग मुलं असे वैयक्तिक जीवन जात असताना तिचे व्यावसायिक आयुष्य देखील कमालीचे उत्तम जात आहे. लवकरच ती शाहरुख खानसोबत ‘जवान’ सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा अजून चित्रीकरणामध्ये असला तरी तिच्याकडे मात्र अजून एक सिनेमा आल्याची चर्चा जोर धरत आहे.

एका रिपोर्टनुसार नयनतारा लवकरच कमल हसनच्या आगामी सिनेमात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. या आगामी सिनेमासाठी निर्मात्यांनी पहिली पसंती नायंत्राला दिली आहे. हा सिनेमा दुसरा कोणता नाही तर बहुचर्चित असा ‘केएच 234’ आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन मणिरत्नम करणार असून, या सिनेमाची तामिळ इंडस्ट्रीमध्ये अनेक दिवसांपासून जोरदार चर्चा सुरु आहे.

‘केएच 234’ या सिनेमाची विशेष बाब म्हणजे कमल हसन यांच्यासोबत मणिरत्नम तब्ब्ल ३५ वर्षांनी काम करणार आहेत. हे दोघं याआधी १९८७ साली ‘नायगन’ साठी एकत्र आले होते. मणिरत्नम यांची पत्नी असलेल्या सुहासिनी यांचे कमल हसन काका आहेत. जर खरंच ‘केएच 234’ मध्ये नयनताराने भूमिका साकारली तर पहिल्यांदाच ती आणि कमल हसन सोबत दिसतील. तर ती पहिल्यांदाच मणिरत्नम यांच्यासोबत काम करेल. शिवाय मणिरत्नम, कमल हसन आणि ए आर रहमान हे तिघं पहिल्यांदाच या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत.

दरम्यान नयनतारा लवकरच शाहरुख खानसोबत जवान या सिनेमात दिसणार असून या सिनेमाचे दिग्दर्शन एटली यांनी केलं आहे. सिनेमात विजय सेतुपति, नयनतारा, सान्या मल्होत्रा, प्रियामणि देखील महत्वाच्या भूमिकेत असून, हा सिनेमा २ जून २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

‘माझा संघर्ष घरात प्रसिद्ध चेहरे असल्यामुळे…’ ‘या’ अभिनेत्रीने सांगितले तिच्या कठीण काळाबद्दल

प्राजक्ता माळीच्या ‘त्या’ पोस्टवरून नेटकऱ्यांनी उडवली तिची खिल्ली विचारले, “हा कोणता खेळ आहे”

हे देखील वाचा