Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड मोठी बातमी! चित्रपट निर्माता इम्तियाज खत्रीच्या घरावर एनसीबीची धाड; अं’मली पदार्थ पुरवल्याचा आहे आरोप

मोठी बातमी! चित्रपट निर्माता इम्तियाज खत्रीच्या घरावर एनसीबीची धाड; अं’मली पदार्थ पुरवल्याचा आहे आरोप

क्रूझ शिप छापा प्रकरणी पुढील कारवाई करत, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) मुंबईतील वांद्रे परिसरातील चित्रपट निर्माता इम्तियाज खत्रीच्या निवासस्थानावर आणि कार्यालयावर छापा टाकला आहे. हा तोच इम्तियाज खत्री आहे ज्याचे नाव अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर अं’मली पदार्थ प्रकरणात समोर आले होते.

इम्तियाजवर यापूर्वीच आरोप झाले आहेत
सीबीआय सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा प्रत्येक बाजूने तपास करत आहे. सीबीआयने या प्रकरणाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीची चौकशी केली होती. या दरम्यान इम्तियाजबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले होते. सुशांत आणि इम्तियाजचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला. माध्यमांतील वृत्तानुसार, जेव्हा सुशांतच्या प्रकरणाचा तपास सुरू झाला, तेव्हा इम्तियाज गायब झाला होता, त्यानंतर त्याच्यावरचा संशय वाढला.

अं’मली पदार्थांचा पुरवठा केल्याचे आरोप
सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर श्रुती मोदीने इम्तियाजवर अभिनेत्याला अं’मली पदार्थ पुरवल्याचा आरोप केला होता. ती म्हणाली होती की, खत्री नावाची व्यक्ती सुशांतला अं’मली पदार्थ पुरवत असे, पण मला त्याचे पूर्ण नाव माहित नाही.

इम्तियाज खत्री कोण आहे?
इम्तियाज खत्री व्यवसायाने बिल्डर असून तो आयएनके इन्फ्रास्ट्रक्चर नावाची कंपनीचा मालक आहे. त्याने २०१७ मध्ये व्हीव्हीआयपी युनिव्हर्सल एन्टरटेन्मेंट नावाची कंपनी स्थापन केली, जी बॉलिवूडमधील नवीन कलाकारांना संधी देते. या कंपनीचा संचालक म्हणून इम्तियाजचे नाव आहे. मुंबईत इम्तियाजची स्वतःची क्रिकेट टीम आहे, तो बॉलिवूड चित्रपटांमध्येही पैसे गुंतवतो.

आर्यनला सुनावण्यात आली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
आर्यन खानला अं’मली पदार्थ प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्याचा जामीन अर्ज शुक्रवारी (०८) फेटाळण्यात आला. आर्यनला न्यायालयाने १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर छापेमारी दरम्यान आर्यनसह अनेक लोकांना एनसीबी टीमने ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर आर्यनची अनेक तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

‘या’ अभिनेत्रीने एका चित्रपटासाठी चक्क स्त्रीचे सौंदर्य खुलवणाऱ्या केसांनाच केले होते बाय- बाय?

-‘गोविंदा गोविंदा’, म्हणत जान्हवीने काढला टॅटू, तर ‘या’ कलाकारांनीही टॅटूद्वारे व्यक्त केलंय आपलं प्रेम

-घटस्फोटानंतर गर्भपात अन् अफेअरच्या अफवांवर समंथाने दिले सडेतोड प्रत्युत्तर; म्हणाली, ‘तुम्ही मला कितीही…’

हे देखील वाचा