Saturday, April 5, 2025
Home बॉलीवूड अनन्या पांडेच्या अडचणीत वाढ; जुने चॅट रिट्रिव्ह करण्यासाठी एनसीबीने जप्त केल्या ‘या’ गोष्टी

अनन्या पांडेच्या अडचणीत वाढ; जुने चॅट रिट्रिव्ह करण्यासाठी एनसीबीने जप्त केल्या ‘या’ गोष्टी

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हिच्याकडे आर्यन खान याच्यासोबत मिळालेल्या चॅटमुळे संशयाची सुई जात आहे. एनसीबीने तिची देखील या बाबत कसून चौकशी केली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, अनन्याचा मोबाईल आणि लॅपटॉपसोबत इतर सात इलेक्ट्रॉनिक्स वस्तू फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवल्या आहेत. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनन्या गांजाबाबत आर्यनसोबत बोलत होती. मात्र, सुरुवातीला अनन्याने या आरोपांवर स्पष्ट नकार दर्शवला होता.

असे म्हटले जात आहे की, चॅटिंग आणि बाकी काही माहिती मिळवण्यासाठी तिच्या वस्तू पाठवल्या आहेत. कारण एनसीबीचे असे म्हणणे आहे की, जर एखादी चॅटिंग डिलीट केली असेल किंवा झाली असेल, तर ती रिट्रिव्ह केली जाऊ शकते. हा रिपोर्ट सोमवारपर्यंत येईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. आता यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. (NCB take over ananya pandey’s 7 gadgets to retrieve chats related to drug including mobile and laptop)

अभिनेत्री अनन्या पांडेची शुक्रवारी (२२ ऑक्टोबर) रोजी नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने चौकशी केली. त्यावेळी अनन्या एनसीबी ऑफिसमध्ये थोडी उशिरा पोहोचली होती. यामुळे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी तिची चांगलीच शाळा घेतली होती. त्यावेळी त्यांनी अनन्याला ११ वाजता वेळ दिली होती, परंतु ती दुपारी २ वाजता पोहोचली.

यावेळी समीर वानखेडे अनन्याला खूप ओरडले आणि बोलले की, “तुम्हाला ११ वाजता बोलोवले होते आणि तुम्ही आता आला आहात. अधिकारी काय तुमची वाट बघत नाही बसणार. हे तुमचे प्रोडक्शन हाऊस नाहीये हे सेंट्रल एजन्सीचे ऑफिस आहे. जी वेळ दिली आहे, त्याच वेळेत येत जावा.”

या चौकशीनंतर आता एनसीबीच्या हातात काय लागणार आहे. तसेच अनन्याला देखील आर्यनप्रमाणे कारागृहात राहावे लागणार आहे का? असे अनेक प्रश्न तिचे चाहते उपस्थित करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘हे तुमचं प्रोडक्शन हाऊस नाही’, कार्यालयात उशिरा पोहचल्यामुळे समीर वानखेडेंनी अनन्याला धरलं धारेवर

-क्रिकेटप्रेमी असणाऱ्या उर्वशी रौतेलाने बुक केले भारत पाकिस्तानच्या सामन्याचे गोल्डन तिकीट

-जॉन अब्राहमचा बहुचर्चित ‘सत्यमेव जयते २’ ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

हे देखील वाचा