Tuesday, June 10, 2025
Home अन्य भारती सिंग अन् हर्ष लिंबाचियाला मिळालेल्या जामिनावर एनसीबी नाखुश; म्हणाले, ‘हे समाजासाठी घातक’

भारती सिंग अन् हर्ष लिंबाचियाला मिळालेल्या जामिनावर एनसीबी नाखुश; म्हणाले, ‘हे समाजासाठी घातक’

‘कॉमेडी क्वीन’ भारती सिंग नेहमी प्रेक्षकांना पोट भरून हसायला भाग पाडते. तिची स्टाईलच अशी आहे की, जो तो तिला पसंत करू लागतो. गमतीदार विनोद असो किंवा मजेदार व्हिडिओ, आपल्या चाहत्यांना हसवण्याची एकही संधी ती सोडत नाही. भारती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. अनेकदा ती तिच्या मजेदार व्हिडिओसाठी चर्चेत येत असते. मात्र भारती आता दुसऱ्याच कारणाने चर्चेत आली आहे.

भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) अटक केली होती. गेल्या वर्षी २१ नोव्हेंबर रोजी एनसीबीला त्यांच्या घरातून गांजा मिळाला होता. एनसीबीने या दोघांनाही ड्रग्ज बाळगणे आणि सेवन केल्याप्रकरणी अटक केली होती. मात्र काही दिवसांनंतरच भारती आणि हर्ष यांना कोर्टातून जामीन मिळाला. तर, एनसीबी या जामिनावर अजिबात खुश नाही. नुकत्याच झालेल्या एका प्रकरणादरम्यान, एनसीबीने मुंबईतील सत्र न्यायालयात आपली नाराजी व्यक्त केली आहे. (ncb unhappy after bharti singh and haarsh limbachiyaa get bail in drugs case says dangerous signal in society)

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर त्याच्या केसमध्ये अनेक ड्रग अँगल समोर आले. पोलिसांनी तपास सुरू केला, तेव्हा अनेक प्रसिद्ध व्यक्तींची नावे समोर आली. नंतर एनसीबीने चौकशी सुरू केली. या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात होता, तसतसे अनेक सेलिब्रिटी एनसीबीच्या रडारावर आले.

भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांची नावे समोर आल्यानंतर एनसीबीने त्यांच्या घरावर छापा टाकून त्यांना अटक केली. माध्यमातील वृत्तानुसार, ड्रग्ज प्रकरणात भारती आणि हर्ष यांना जामीन देण्याच्या निर्णयावर एनसीबी अजिबात खुश नाही.

महत्वाचे म्हणजे, कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला, कारण कोर्टात एनसीबीने हर्ष आणि भारती सिंग यांच्याविरोधात कोणताही ठोस पुरावा दाखल केला नव्हता. प्रत्येकी १५-१५ हजार रुपये जमा केल्यानंतर, भारती आणि हर्ष यांची जामिनावर सुटका झाली.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-चार वर्षांची असताना दिव्या दत्ताने पाहिले होते ‘हे’ स्वप्न; ‘अशा’प्रकारे ‘शब्बो’ने मारली रुपेरी पडद्यावर एन्ट्री

-विजय देवरकोंडाने वाढदिवसानिमित्त आईला दिली ‘ही’ अनोखी भेट; पाहुन तुम्हीही व्हाल स्तब्ध

-ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार फेस्टिवल धमाका! ऑक्टोबरमध्ये भेटीला येतायेत ‘हे’ चित्रपट अन् वेब सीरिज

हे देखील वाचा