Wednesday, July 3, 2024

नीना गुप्ता यांनी नवीन वर्षात मुलगी मसाबासाठी तयार केले ‘हे’ तीन कडक नियम

आपण सर्वांनीच दणक्यात नवीन वर्षाची सुरुवात केली आहे. यात कलाकार देखील मागे नाही. कलाकारांनी वेगवेगळ्या ठिकाणी जात त्यांचे नवीन वर्ष साजरे केले. सध्या सोशल मीडियावर कलाकार त्यांच्या नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट करताना दिसत आहे. अनेक कलाकार त्यांचे नवीन वर्षाचे प्रण देखील शेअर करताना दिसत आहे. यासर्वांमधे फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताने शेअर केलेला व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मसाबाने शेअर केलेल्या या मजेदार व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स देखील पाहायला मिळत आहे. मसाबाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये नीना गुप्ता दिसत असून त्या त्यांच्या मुलीला अर्थात मसाबाला काही टिप्स देताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये मसाबा तिच्या आईला नीना गुप्ता यांना नवीन वर्षाच्या गिफ्ट्सबद्दल आणि नवीन वर्षाची नवीन प्रणबद्दल विचारते. या व्हिडिओमध्ये अतिशय सध्या आणि सोबर लूकमध्ये दिसणाऱ्या नीना तिला तीन टिप्स किंवा तीन महत्वाच्या गोष्टी सांगतात ज्या सामान्यतः प्रत्येक आई आपल्या मुलांना सांगू इच्छिते. मसाबाने सोशल मीडियावर लिहिले, “मी आईला तिच्या नवीन वर्षाच्या प्रणबद्दल विचारले. तिने ते तर नाही सांगितले, मात्र हे नक्कीच सांगितले मला तिच्यासाठी काय करायचे.”

नीना गुप्ताने त्यांच्या मुलीकडून तीन वचनं घेतली आहेत. त्यांनी सांगितले की, “वचन दे तू माझ्यावर ओरडणार नाहीस.”, दुसरे. “तू मला म्हातारी नाही म्हणणार, आणि तिसरे असे की, सर्वानाच माहित आहे, आयुष्यात हळू आणि स्थिरतेसोबतच पुढे जायचे असते.” नीना या बॉलिवूड मधील सर्वात कुल आई आहेत. नीना यांच्या या व्हिडिओवर कलाकार आणि त्यांचे फॅन्स मजेशीर कमेंट्स देखील करताना दिसत आहे. त्यांनी त्यांच्या मुलीचा सांभाळ एकटीने केला. सध्या त्या एकापेक्षा एक सरस चित्रपटांमध्ये दिसत आहे. ‘बधाई हो’, ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’, ‘पंगा’ आदी चित्रपटांमधून त्यांनी त्यांचा प्रभावी अभिनय सर्वांना दाखवला आहे.

काही दिवसांपूर्वीच नीना गुप्ता यांचे आत्मचरित्र ‘सच कहूं तो’ प्रकाशित करण्यात आले. यात त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचे खुलासे केले आहेत.

हेही वाचा :

आनंद शिंदे यांनी मीरा आणि जय यांना दिली गाण्याची ऑफर, आगामी काळात झळकणार एकत्र

‘भाऊने माझा केसाने गळा कापला असता’, म्हणत कुशल बद्रिकेने शेअर केला भाऊ कदमसोबतचा ‘तो’ किस्सा

अजय देवगणच्या लेकीचे बोल्ड फोटो होतायत इंटरनेटवर व्हायरल, तुम्ही पाहिले का?

हे देखील वाचा