Wednesday, June 25, 2025
Home बॉलीवूड ‘ते मला चुकीच्या जागी स्पर्श करत होते’, प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्तांचा धक्कादायक खुलासा

‘ते मला चुकीच्या जागी स्पर्श करत होते’, प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्तांचा धक्कादायक खुलासा

अभिनेत्री नीना गुप्ता या बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनी ‘बधाई हो’, ‘शुभमंगल जादा सावधान’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. त्यांचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत त्या अनेकवेळा खुलासा करत असतात. अशातच नीना यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल असा एक खुलासा खुलासा केला आहे, जो ऐकून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल.

नुकतेच काही दिवसांपूर्वी त्यांचे ‘सच कहूं तो’ हे पुस्तक प्रदर्शित झाले आहे. या पुस्तकात त्यांनी त्यांचे आत्मचरित्र लिहिले आहे. या पुस्तकात त्यांनी त्यांचे लैंगिक शोषण झाल्याबाबत लिहिले आहे. त्यांनी याबाबत एक किस्सा शेअर केला आहे. त्यांनी सांगितले की, जेव्हा त्या शाळेत होत्या, तेव्हा त्या एका डोळ्यांच्या डॉक्टरांकडे गेल्या होत्या. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांच्या भावाला वेटिंग रुममध्ये बसवले होते आणि त्यांना आत रूममध्ये बोलावले. त्यांनी सांगितले की, डॉक्टर चुकीच्या जागी हात लावत होते. त्यांना त्यांच्या डोळ्यांशी काय देणं-घेणं नव्हतं. (Neena Gupta autobiography, actress reveals that she was molested in childhood)

त्यांनी सांगितले की, त्यावेळी त्या खूप घाबरल्या होत्या आणि त्यांना स्वतःचा राग येऊ लागला होता. त्यांनी सांगितले की, घरी जाऊन एका कोपऱ्यात त्या खूप रडायला लागल्या होत्या, पण याबाबत त्यांच्या आईला सांगण्याची त्यांची हिंमत झाली नव्हती.

यानंतर त्यांनी अशा अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. त्यांनी सांगितले की, त्या नेहमी शिंप्याकडे कपडे शिवण्यासाठी जात असायच्या. तो शिंपी नेहमीच माप घेण्याच्या निमित्ताने त्यांना चुकीचा स्पर्श करत असायचा, परंतु तरीही त्यांना त्यांच्याकडे कपडे शिवण्यासाठी जायला लागायचे. त्या त्यांच्या आईला नाही असे म्हणू शकत नव्हत्या; कारण त्यांनी जर असे केले असते, तर त्यांना सगळे खरेखरे सांगायला लागले असते.

नीना गुप्ता यांनी त्यांच्या ‘सच कहूं तो’ या पुस्तकात त्यांच्या करिअरमधील तसेच वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. या सोबतच त्यांनी त्यांच्या बालपणातील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. या पुस्तकात कास्टिंग काऊचबद्दल देखील सांगितले आहे. यासोबतच चित्रपटसृष्टीतील राजकारण, प्रेग्नंसी, करिअर याबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या चित्रपटांबाबत बोलायचं झालं, तर त्या ‘गुडबाय’ या आगामी चित्रपटात झळकणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सोनम कपूर ते करीना कपूरपर्यंत अनेक अभिनेत्रींना आवडतात मसाबाने डिझाईन केलेले कपडे, पाहा तिची स्टाईल

-‘सलमान एकटा असून, त्याला खास व्यक्तीची गरज आहे’, म्हणत महेश मांजरेकरांनी केले दबंग खानच्या लग्नावर वक्तव्य

-असे काय झाले की, आपल्याच पोटच्या मुलाला विसरली जिनिलिया देशमुख? व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

हे देखील वाचा