कोराना काळापसून हिंदी आणि माराठी सिनेसृष्टीमधील अनेक कलाकारांनी लग्नगाठ बांधून अनेकांना हैराण केलं होतं, त्याशिवाय 2022 यावर्षी देखिल अनेक जोडप्यांनी आपल्या नात्याला विवाह बंधानत अडकवले. अशातच बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा गुप्ता हिने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. मसाबा देखिल बॉलिवूडमधी प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि अभिनेत्री आहे.
दिग्गज अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) यांची मुलगी मसाबा गुप्ता (Masaba Gupta) ही नुकतंच विवाह बंधनात अडकली आहे. तिने (दि, 27 जानेवारी) रोजी म्हणजेच आज सकाळीच तिचा बॉयफ्रेंड अभिनेता सत्यदीप मिश्रा (Satyadeep Mishra) याच्यासोबत गुपचुप लग्न सोहळा उरकाला आहे. मसाबाने आपल्या अधिकृत इंस्टग्राम अकाउंटवरुन लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.
View this post on Instagram
अचानकच मसाबच्या लग्नाची बातमी एकून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मसाबाने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “आज मी माझ्या प्रेमाशी, माझ्या संसाराशी लग्न केलं आहे. नाव प्रेम, शांती, स्थिरता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे येणाऱ्या आयुष्यात हसू. मला कॅप्शन निवडून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद…हे आयुष्य खूप मजेशीर असणार आहे.” असं म्हणत तिने चाहत्यांनादेखिल तिच्या खास क्षणी सामावून घेतलं आहे.
View this post on Instagram
सांगायचे झाले तर मसाबने तिच्या लग्नासाठी स्वत:च्या कलेक्शनमधून लाइट गुलाबी आणि हिरव्या रंगाचा शानदार घागरा निवडला आहे, त्यासोबतच सत्यदीप देखिल मॅचिंग अउटफीटमध्ये पाहायला मिळाला. मसाबने तिच्या आईची ज्वेलरी घातली होती. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये दोघांची जोडी देखिल खूपच सुंदर दिसत होती. त्यासोबतच व्हायरल झालेल्या फोटोंवर चाहत्यांनीदेखील शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘पठाण’ने बाॅलिवूडला दिली संजीवनी! पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई करत रचले विक्रमांचे मनोरे
शाहरुख खानच्या मन्नतपशी अब्दु रोजिकचीच हवा, पाहा व्हायरल व्हिडिओ