Friday, July 25, 2025
Home बॉलीवूड जेव्हा अवॉर्ड मिळताच अमरीश पुरींसोबत हस्तांदोलन करायला विसरल्या नीना गुप्ता; व्हायरल होतोय जुना व्हिडिओ

जेव्हा अवॉर्ड मिळताच अमरीश पुरींसोबत हस्तांदोलन करायला विसरल्या नीना गुप्ता; व्हायरल होतोय जुना व्हिडिओ

अभिनेत्री नीना गुप्ता यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाने त्यांनी अनेक चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. त्यांनी रुपेरी पडद्यावर अनेक भूमिका साकारल्या आहेत. इतकेच नव्हे तर त्यांनी छोट्या पडद्यावरही अनेक भूमिका साकारल्या आहेत, ज्या आज ही प्रेक्षकांना आठवतात. त्याचबरोबर त्या आपले वैयक्तिक आयुष्यही तितकेच एन्जॉय करतात. त्या अनेकदा त्यांचे मित्र आणि कुटुंबियांसोबत मजेदार अंदाजात दिसतात. ऑनस्क्रीन असो किंवा ऑफ स्क्रीन, नीना यांची स्टाईल प्रेक्षकांना नेहमीच आवडते. त्यांची मुलगी आणि फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता हिने तिच्या आईचा असाच एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात त्या स्टेजवर पुरस्कार मिळाल्यानंतर भाषण करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ज्येष्ठ अभिनेते अमरीश पुरी हे नीना यांना पुरस्कार देत आहेत.

हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत खूप मजेशीर आहे. खरं तर, स्टेजवर बसलेल्या नीना या स्वतःच्या मस्तीमध्ये दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये अमरीश पुरी नीना यांना पुरस्कार देत आहेत आणि नंतर ते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हात पुढे करतात. मात्र पुरस्कार मिळताच नीना पुढे निघून जातात. त्या अमरीश पुरी यांच्याकडून शुभेच्छा घ्यायला विसरतात. मग अचानक नीना अमरीश पुरी यांनी पुढे केलेला हात पाहतात आणि मग हस्तांदोलन करतात. हे दृश्य पाहून प्रेक्षकही हसायला लागतात.

यानंतर, नीना या माईकच्या दिशेने पुढे जातात आणि त्या माईकमध्ये बोलतात की, “बोला मिस्टर रोशनलाल, अपना यार है जरा खस्ता हल. सौ का नोट जरा दीज‍िए निकाल” हा डायलॉग ऐकताच प्रेक्षक जोरदार टाळ्यांचा कडकडाट करू लागले. प्रथम हा व्हिडिओ नीना यांची मुलगी मसाबाने शेअर केला. त्यानंतर स्वतः नीना यांनीही हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी सांगितले आहे की, त्यांचा हा डायलॉग ‘बुनियाद’ या मालिकेतील आहेत, जो प्रेक्षकांना ऐकायला खूप आवडतो. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये नीना या निळ्या सोनेरी कुर्तामध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘कू’ ऍपवरही कंगना रणौत गाजवतेय वर्चस्व; काही दिवसांतच मिळवले तब्बल ‘इतके’ फॉलोव्हर्स

-‘हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट’, म्हणत मनोज पाटील आत्महत्या प्रकरणावर साहिल खानने सोडले मौन

-शूटिंग सोडून तुर्कीमध्ये ‘हे’ काम करताना दिसली बॉलिवूडची ‘बार्बी गर्ल’, व्हिडिओ शेअर करत म्हणतेय…

हे देखील वाचा