Sunday, May 19, 2024

‘सच कहूं तो’मध्ये नीना गुप्ता यांनी केला त्यांच्या पहिल्या लग्नाबाबत खुलासा; म्हणाल्या, ‘तो अनुभव खूपच…’

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता या दिवसात त्यांचे आत्मचरित्र ‘सच कहूं तो’ यामुळे खूप चर्चेत आहे. या पुस्तकात त्यांनी अशा काही घटनांचा खुलासा केला आहे, ज्यामुळे त्या इंडस्ट्रीमध्ये खूप चर्चेत आल्या आहेत. या पुस्तकात त्यांनी त्यांच्या पहिल्या लग्नाबाबत सांगितले की, हे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही. त्यांनी अमलान कुमार घोष यांच्याशी झालेल्या लग्नाबाबत काही गोष्टी सांगितल्या आहेत. नीना यांनी या पुस्तकात लिहिले आहे की, इंटर कॉलेजच्या एका कार्यक्रमात अमलान घोष यांच्याशी त्यांची पहिली भेट झाली होती. अमलान हे आयआयटी दिल्लीमध्ये शिक्षण घेत होते. ते दोघेही त्यांच्या हॉस्टेल कॅम्पस किंवा घराच्या बाजूला गुपचूप भेटत असायचे.

त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की, अमलानचे आई-वडील दुसऱ्या शहरात राहत होते. परंतु त्याचे आजोबा नीनाच्या शेजारी राहत होते. त्यामुळे ते दोघे अनेक वेळा एकमेकांना भेटायचे आणि अनेक सण एकत्र साजरे करायचे. नीना यांनी हे देखील लिहिले आहे की, त्यांना बॉयफ्रेंड असणे ही गोष्ट त्यांच्या घरच्यांना अजिबात मान्य नव्हती. परंतु हा अनुभव खूप रोमांचक होता. ते दोघे अनेकवेळा कारने डेटवर जात असे. तसेच त्या दोघांनी आयआयटी दिल्लीमध्ये खूप वेळ एकत्र घालवला आहे.

याबाबत त्यांनी सांगितले की, अनेक दिवस त्यांच्या आईपासून त्यांचे रिलेशन लपवल्यानंतर, त्या खूप सिरियस झाल्या होत्या. यानंतर त्यांनी त्यांच्या आईला सांगितले की, त्या त्यांच्या रिलेशनबाबत खूप सिरियस आहेत. त्यांची आई याबाबत जास्त काही खुश नव्हती. तरी देखील त्या दोघांनी लग्न केले.

त्यांचे लग्न कसे झाले याबाबत नीना गुप्ता यांनी लिहिले आहे की, अमलान आणि त्यांच्या सगळ्या मित्रांनी श्रीनगरला ट्रिपला जायचे प्लॅनिंग केले होते. त्यांना देखील जायचे होते, परंतु त्यांच्या आईने जाण्यास नकार दिला. त्या म्हणाल्या की, अमलानसोबत लग्न झाल्यावर त्या त्यांच्यासोबत कुठेही फिरू शकतात.

नीना गुप्ता यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग त्यांनी त्यांच्या या आत्मचरित्रात मांडल्या आहेत. तसेच व्यावसायिक आयुष्यातील अनेक गोष्टी देखील त्यांनी सांगितल्या आहेत.(Neena gupta reveals about her first marriage in her ‘sach kahu to’ book)

अधिक वाचा-
जान्हवी कपूरने गाेल्डन ड्रेसमध्ये केले ग्लॅमरस फाेटाेशूट, एकदा पाहाच
शिव ठाकरेची एक्स गर्लफ्रेंड अडकली विवाह बंधनात? जाणून घ्या सत्य

हे देखील वाचा