Monday, March 4, 2024

‘इथे हे सर्वांसोबतच होते’ गरम मसाला फेम अभिनेत्रीने दिला प्रियांकाच्या ‘त्या’ विधानाला पाठिंबा

प्रियांका चोप्रा सध्या विविध कारणांमुळे चांगलीच गाजत आहे. एकतर तिची ‘सिटाडेल’ ही सिरीज प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ती पुन्हा भारतात परत आल्यामुळे आणि मुख्य म्हणजे काही दिवसांपूर्वीच तिने बॉलिवूमध्ये काम करणे कमी केल्याचा खुलासा केल्यामुळे खूपच चर्चेत आली आहे. बॉलिवूमध्ये होणाऱ्या राजकारणाला कंटाळून ती हॉलिवूडमध्ये गेल्याचे तिने सांगितले. तिच्या या वक्तव्यावर अनेक कलाकारांनी पाठिंबा दर्शवला आहे. आता अभिनेत्री नितु चंद्राने देखील प्रियंकाला पाठिंबा दिला आहे.

सेलिब्रिटी फोटोग्राफर असणाऱ्या विरल भयानीने त्याच्या सोशल मीडिया पेजवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये नितु चंद्रा प्रियांका चोप्राच्या वक्तव्यावर बोलताना दिसत आहे. नितुला विचारले जाते की, “प्रियांका चोप्राला वाटते की, बॉलिवूडमध्ये खूप राजकारण आहे, आणि म्हणूनच ती परदेशात शिफ्ट झाली. यावर तुला काय वाटते?” यावर नितु उत्तर देताना म्हणते, “असे अनेक लोकांसोबत झाले आहे. चांगले काम करायला वेळ लागतो.”

पुढे नितु चंद्रा म्हणते, “इथे हे सर्वांसोबतच होते. असे नाही की, कोणत्या एकासोबत होईल. जे लोकं चित्रपटाच्या पार्श्वभूमीतून आले नाही, त्यांना तर इंडस्ट्रीमध्ये काम मिळवण्यासाठी लढावे लागते. चांगले काम करायला वेळ लागतो. प्रियांकाला लागला, मला लागला आणि अजून खूप लोकांना लागला. गोष्टी हीच आहे की, तुम्ही पुढे येऊन बोलू शकता की नाही.” दरम्यान नितुच्या आधी कंगना रणौत, विवेक अग्निहोत्री, अपूर्व असरानी, शेखर सुमन आदी अनेक कलाकारांनी प्रियंकाला पाठिंबा दिला आहे.

तत्पूर्वी नितु एक अभिनेत्री असून तिने गरम मसाला, ट्रॅफिक सिंग्नल, रण, ओय लकी लकी ओय आदी हिंदी चित्रपटांमध्ये काम केले असून, ती दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये देखील सक्रिय आहे. मात्र तिला बॉलिवूडमध्ये अपेक्षित यश मिळाले नाही.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रामलीला सिनेमाच्या सेटवरचे ‘ते’ चित्र पाहत शरद केळकर म्हणाला होता ‘भन्साळी किती पैसे वाया घालवतात यात मी…’

‘मास्टरशेफ इंडिया’ शोला मिळाला अंतिम विजेता ‘या’ स्पर्धकाने ट्रॉफीवर नाव कोरत मिळवले २५ लाखांचे बक्षीस

हे देखील वाचा