Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड ‘ऋषीजींचा अंत अन् माझी सुरुवात…’, असं का म्हणाल्या नीतू कपूर?

‘ऋषीजींचा अंत अन् माझी सुरुवात…’, असं का म्हणाल्या नीतू कपूर?

वयाच्या ६३व्या वर्षीही ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर (Neetu Kapoor) यांच्या सौंदर्यात कोणतीही कमतरता नाही. जेव्हा त्यांना या सदाबहार सौंदर्याचे रहस्य विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी हसून उत्तर दिले की, “मी आता स्वतः ची अधिक काळजी घेत आहे आणि माझ्या लूकसाठी अधिक वेळ देत आहे.” यासोबतच अभिनेत्री टीव्हीवर पदार्पण केल्याबद्दलही बोलल्या आहेत.

एका वृत्तसंस्थेशी बोलताना नीतू कपूर यांनी ‘डान्स दीवाने ज्युनियर्स’ मधून त्यांच्या टेलिव्हिजन पदार्पणाबद्दलचा उत्साह शेअर केला. त्या म्हणाली, “मुलांचा शो असल्यामुळे निर्मात्यांनी माझ्याशी संपर्क साधला, कारण मला त्यांच्याशी विशेष लगाव आहे. तेव्हा मी खूप उत्साहीत झाले. तसेच, संपूर्ण टेलिव्हिजन वातावरण माझ्यासाठी नवीन आहे, त्यामुळे मी खूप आनंदीही होते.” (neetu kapoor became emotional she said in memory of husband rishi kapoor)

नीतू कपूरचा लहान मुलांशी लगाव
नीतू कपूर यांनी त्यांच्या टेलिव्हिजन पदार्पणाबद्दल सांगितले की, “हे माझ्यासाठी खूप आव्हानात्मक आणि खूप नवीन आहे. त्याचप्रमाणे ‘जुग जग जिओ’ हे सुद्धा आव्हान होते. नुकतेच माझ्या पतीचे निधन झाल्यानंतर, मी हा चित्रपट केला तेव्हा माझा आत्मविश्वास शून्य होता. पण हळूहळू मला आत्मविश्वास मिळाला. पहिला दिवस चांगला गेला नाही, पण प्रत्येक दिवसाबरोबर माझा आत्मविश्वास परत येऊ लागला.”

पती ऋषी कपूरबद्दल बोलल्या ‘असे’ काही
हा शो नीतूच्या जवळचा आहे कारण त्यांनी ३१ मार्च रोजी काम सुरू केले होते, जेव्हा त्यांचे दिवंगत पती ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांचा शेवटचा चित्रपट ‘शर्माजी नमकीन’ प्रदर्शित झाला होता. यावर त्या म्हणाला, “हे माझ्यासाठी भावनिकदृष्ट्या खूप आव्हानात्मक होते, कारण ऋषीजींचा शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाला त्याच दिवशी मी या शोचे शूटिंग सुरू केले. त्याचा प्रवास संपला आणि माझा पुन्हा सुरू झाला, हे खूपच विचित्र होते.”

नीतू कपूरने रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या नात्याबद्दल कळल्यावत त्यांची प्रतिक्रिया काय होती हेही सांगितले. यावेळी त्यांनी या नात्यावर आनंद व्यक्त केला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा