Friday, March 29, 2024

ऋषी कपूरच्या निधनानंतर सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या नीतू कपूर ट्रोलर्सच्या निशाण्यावर

ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांच्या निधनानंतर इंस्टाग्रामवरील पोस्टमुळे काही लोकांनी ट्रोल केले असल्याची माहिती पत्नी नीतू कपूर यांनी दिली. दोन वर्षांपूर्वी अभिनेते ऋषी कपूर हे जग सोडून गेले. नीतू कपूर (Neetu Kapoor) काही महिन्यांपूर्वीच इंस्टाग्रामवर सक्रिय झाल्या आहेत. त्या सध्या विविध प्रकल्पांमध्ये काम करताना दिसत आहेत. मात्र त्यांनी हे सगळे करण्यापेक्षा पतीच्या निधनाचा शोक व्यक्त करावा, अशी टीका नेटकऱ्यांनी केल्याची माहिती नीतू कपूर यांनी दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री नीतू कपूर यांनी त्या कामात व्यक्त होणार असल्याचे सांगितले होते. जेणेकरून ऋषी कपूर यांना गमावण्याचे विसरतील. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर त्यांनी सामाजिक कार्यात व्यस्त राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी आता म्हटले आहे की, लोक असेच टीका करत राहतील आणि ट्रोल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना इंटरनेटवर ब्लॉक करेल. नीतू कपूर यांचे इन्स्टाग्रामवर १.८ मिलियन फॉलोअर्स आहेत. ‘फिल्म कम्पॅनियन’शी झालेल्या संवादादरम्यान त्या म्हणाल्या की, “मला हे सर्व करायला आवडते म्हणून मी काही गोष्टी करते. मी त्याचा आनंद घेते. माझे माझ्या चाहत्यांवर प्रेम आहे. जे मला ट्रोल करतात त्यांनाच मी ब्लॉक करते.”

ऋषी कपूर यांचा उल्लेख करत नीतू कपूर म्हणाल्या की, “मी माझ्या पतीला विसरू शकत नाही. ते आयुष्यभर माझ्यासोबत, माझ्या मुलांसोबत इथेच असतील. आजही जेवताना फक्त त्यांचीच चर्चा होते. अशा प्रकारे आम्ही त्यांची आठवण काढतो. रणबीरच्या स्क्रीनसेव्हरवर अजूनही त्यांचा फोटो आहे. आपण त्यांना चांगल्या काळासाठी लक्षात ठेवू शकतो.” दरम्यान नीतू कपूर आणि ऋषी यांनी जानेवारी १९८० मध्ये लग्न केले होते. तर एप्रिल २०२० मध्ये, ऋषी कपूर यांचे कर्करोगामुळे निधन झाले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा