×

पार पडले ए.आर. रहमानच्या मुलीचे शानदार वेडिंग रिसेप्शन; पण खतिजाला बुरख्यात पाहून नेटकरी म्हणाले…

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान (Ar.Rahman) हे अशा व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत, जे क्वचितच मीडिया आणि प्रसिद्धीच्या झोतात दिसतात. त्यांच्या कामाशी संबंधित माहिती शेअर करण्यासाठीच ते बहुतेकदा सोशल मीडियाचा वापर करतात. परंतु अलीकडेच त्यांची मुलगी खतिजाचे लग्न झाले आहे, ज्याबद्दल त्यांनी सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे. नुकतेच त्यांनी मुलगी खतिजा हिच्या लग्नाचा फोटो शेअर केला असून, लग्नाच्या रिसेप्शनचा व्हिडिओही शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी ए.आर. रहमानच्या साधेपणाचे जोरदार कौतुक केले आहे.

ए.आर. रहमानने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या लग्नाच्या रिसेप्शनच्या व्हिडिओमध्ये मुलगी खतिजा आणि जावई रियासदीन शेख पारंपारिक लूकमध्ये स्टेजवर पाहुण्यांना भेटताना दिसत आहेत. तर खतिजा नेहमीप्रमाणे बुरख्यात दिसली. कमेंट करून नवीन जोडप्याचे अभिनंदन करण्यासोबतच नेटकरी त्यांचे कौतुकही करत आहेत. एआर रहमानने आपल्या मुलीचे लग्न ते रिसेप्शन चांगलेच भव्यदिव्य केले आहे. लग्नाचे ठिकाण छान सजावट आणि रोषणाईने सजवले गेले आहे, परंतु त्यांनी सर्व काही अत्यंत साधेपणाने केले आहे. या सोहळ्यात कोणत्याही प्रकारची धामधूम नसल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. संगीतही शास्त्रीय ठेवण्यात आले आहे. त्याचा आणि खतिजा यांच्या साधेपणाचे सर्वच कौतुक करताना दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by ARR (@arrahman)

ए.आर. रहमानने शेअर केलेला खतिजाच्या लग्नाच्या रिसेप्शनचा व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्स जोरदार कमेंट करत आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले की, “याला म्हणतात साधेपणा, दिखावा नाही अल्लाह तुम्हाला सर्व सुख देवो.” त्याचप्रमाणे खतिजाचे कौतुक करताना एका यूजरने “अभिनंदन मॅडम, मी तुमच्यासाठी खूप आनंदी आहे, मला आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे.” अशा शब्दात लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान एआर रहमान यांनी वयाच्या २३ व्या वर्षी धर्मांतर करून इस्लामचा स्वीकार केला. त्यांचे पहिले नाव दिलीप कुमार होते, जे बदलून त्यांनी ए.आर. रहमान केले. त्यांची मुलगी खतिजा हिचेही अनेक फोटो सोशल मीडियावर आहेत आणि या सगळ्यात ती हिजाब किंवा निकाबमध्येच दिसते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post