Saturday, June 29, 2024

विद्या बालन गुप्तहेर बनून उलगडणार खुनाचे गूढ? ‘या’ दिवशी प्रदर्शित हाेणार चित्रपट

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन ही फिल्म इंडस्ट्रीतील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जी नेहमीच वेगवेगळ्या भूमिका साकरते. विद्याने तिच्या करिअरमध्ये ‘डर्टी पिक्चर’, ‘कहानी’ सारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अशातच ती सध्या तिच्या आगामी ‘नियत’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील तिच्या भूमिकेमुळे विद्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. विद्याच्या या चित्रपटाची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. अशात‘नियात’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे.

विद्या बालनच्या ‘नियत’ चित्रपटाचा ट्रेलर आज गुरुवारी (22 जुन)ला रिलीज झाला आहे, जो अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. ट्रेलरमधील विविध छटांमध्ये अचानक असे काहीतरी घडते जे प्रत्येकाचे आयुष्य बदलून टाकते. ट्रेलरमध्ये असे दाखवण्यात आले आहे की, राम कपूर आत्म’हत्या करतो असे सर्वांना वाटते, पण त्याच दरम्यान विद्या बाल आत येते आणि ती आत्म’हत्या नसून हत्या असल्याचे सांगते. त्यानंतरच चित्रपटात सत्याचा शोध सुरू होतो. ‘नियत’चा ट्रेलर खूपच मनोरंजक आहे. त्याचबरोबर विद्याचा अभिनयही नेहमीप्रमाणे दमदार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vidya Balan (@balanvidya)

अनु मेनन दिग्दर्शित ‘नियत’ हा चित्रपट सस्पेन्सने भरलेला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला खूप पसंती दिली जात आहे. यावर युजर्स सतत कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. या चित्रपटात विद्या बालनने गुप्तहेर मीरा रावची भूमिका साकारली असून ती या चित्रपटात एका हत्येचे गूढ उकलताना दिसणार आहे. त्यामुळे अभिनेत्रीच्या चाहत्याची उत्सुकता चार पटीने वाढली आहे.

‘नियत’ चित्रपटाचे शूटिंग यूकेमध्ये झाले आहे. अशात विद्याशिवाय या चित्रपटात राम कपूर आणि राहुल बोस यांच्या देखील महत्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 7 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.(neeyat trailer release actress vidya balan turns detective and uncover the hidden motives in murder mystery watch video)

अधिक वाचा –
‘मोगॅम्बो खुश हुआ’, म्हणत पडद्यावर क्रूर खलनायक रंगवणारे अमरीश पुरी, सिनेमात येण्यापूर्वी राबले विमा कंपनीत
अवनीत काैरचा हॉट अंदाज चाहत्यांना लावतोय वेड, तुम्ही पाहिला का?

हे देखील वाचा