Thursday, April 18, 2024

विद्या बालनला मिळाला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, सूर कोकिळेला आठवून भावूक झाली अभिनेत्री

विद्या बालन ही बॉलिवूडची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे. ती एक अशी अभिनेत्री आहे जिने हिरोशिवाय अनेक चित्रपट केले आणि इंडस्ट्रीत यश मिळवले. ही अभिनेत्री तिच्या फीमेल सेंट्रिक चित्रपटांसाठी ओळखली जाते. त्याचबरोबर नुकत्याच शणमुखानंद सभागृहात झालेल्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्यात या अभिनेत्रीने हा पुरस्कार पटकावला आहे. त्यादरम्यान विद्या खूप भावूक झाली होती.

विद्या बालन (vidya balan) ही लता मंगेशकर (lata mangeshkar) यांची मोठी चाहती आहे. पुरस्कार स्वीकारताना, अभिनेत्रीने खुलासा केला की, तिने आज लताजींनी भेट दिलेली साडी नेसली. अभिनेत्री म्हणाली की, “एक नवीन अभिनेत्री म्हणून मी लता मंगेशकर यांना एका कार्यक्रमात खूप आवडीने पाहत होती. नंतर मी हिम्मत करून त्यांना फोन केला. मी फोनवर त्यांचा दिव्य आवाज ऐकला, ज्यानंतर त्यांनी मला घरी एक साडी पाठवली आणि ती साडी माझ्यासाठी आशीर्वाद होती. मला ही साडी नेसून एक दिवस त्यांना दाखवायची होते, म्हणून मी ही साडी आज नेसली आहे. मी प्रतिष्ठेचा मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्राप्त करत आहे. हा खरोखर माझ्यासाठी आशीर्वाद आहे आणि मी बोलत असताना थरथरत आहे. मला दिलेल्या या सन्मानाबद्दल मनःपूर्वक आभार.”

आशा भोसले यांनाही प्रतिष्ठेचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळाला आहे. त्या म्हणाला की, हा माझा सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे, परंतु मला इच्छा आहे की, लता दीदी येथे वैयक्तिकरित्या हव्या हाेत्या. त्यांच्या बालपणातील प्रसंग आठवत आशाने काही ओळी गायल्या. आशा भोसले यांनी हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेला ‘मोगरा फुलाला’ भावूकपणे गायला आणि त्यानंतर उपस्थित सर्वांनी लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या.


हा पुरस्कार स्वर्गीय मास्टर दीनानाथ मंगेशकर, पुणे यांच्या 81व्या स्मृतीदिनानिमित्त दिला जातो, ही एक नोंदणीकृत सार्वजनिक धर्मादाय ट्रस्ट आहे, ज्याची स्थापना मंगेशकर कुटुंबाने गेल्या 33 वर्षांपुर्वी केली आहे.(bollywood actress vidya balan wear lata mangeshkar gifted saree while receiving dinanath mangeshkar award and become emotional)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मोठमोठ्या लोकांवर विनोद करणाऱ्या कपिल शर्माला मुलीची ‘ती’ मागणी ऐकून फुटला होता घाम, वाचा तो किस्सा

वयाच्या 16व्या वर्षी अशी दिसत होती ‘शकुंतलम’ अभिनेत्री, फोटो पाहून तुम्ही व्हाल थक्क

हे देखील वाचा