Saturday, June 29, 2024

लग्नानंतर दोनच महिन्यात नेहा कक्करने दिली नेटकऱ्यांना ‘गोड बातमी’!

आपल्या जबरदस्त आवाजाने सर्वांना थिरकायला लावणारी नेहा कक्कर लवकरच आई होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. नेहाने नुकताच तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेयर केला आहे. ज्यात ती आणि रोहनप्रीत असून, नेहाचा बेबी बंप या फोटोत अगदी स्पष्ट दिसत आहे.

‘लंडनदा ठुमकदा’ पासून ते ‘काला चष्मा’ पर्यंत अनेक गाण्यांना आपला आवाज देऊन या गाण्यांवर सर्वांना थिरकायला लावणारी गायिका म्हणजे नेहा कक्कर. नेहाने २४ ऑक्टोबर २०२० मध्ये रायझिंग स्टार फेम गायक रोहनप्रीत सिंगसोबत विवाह बंधनात अडकली. तेव्हापासून नेहा विविध कारणांमुळे सातत्याने चर्चेत आहे.

नेहाला तिच्या लग्नात अनेक अभिनेत्रींना कॉपी करून लग्नात ड्रेस घातल्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले. हि चर्चा संपत नाही तोवर आता नेहाच्या प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. लग्नाला दोन महिनेच झाले असल्याने नेहा लग्नाधीपासूनच प्रेग्नेंट असल्याच्या चर्चाना आता उधाण आले आहे.

नेहाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन तिचा आणि रोहनप्रीतचा एक फोटो शेयर केला असून यात ती प्रेग्नेंट दिसत आहे. टोन्ड जमसूट आणि पांढऱ्या स्निकर्समध्ये नेहा आणि तिच्यासोबत सूट, काळ्या रंगाची पगडी अशा जबरदस्त लूकमध्ये असणारा रोहनप्रीत आणि नेहाचा तिच्या पोटावर असलेला हात असा हा फोटो सर्वांचेच लक्ष वेधत आहेत.

हा फोटो शेयर करताना तिने “खयाल रखा कर” असा हॅशटॅग दिला आहे. तिच्या या फोटोला मोठ्या प्रमाणावर कमेंट येत असून तिच्यावर आणि रोहनप्रीतवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तिच्या या फोटोला रोहनप्रीतने ‘आता तर अजून जास्त काळजी घ्यावी लागेल’, अशी कमेंट केली आहे.

मात्र अजून नेहा आणि रोहनप्रीत यांच्याकडून नेहाच्या प्रेगन्सीबद्दल कोणतेही अधिकृत वक्तव्य आले नसले तरी त्यांनी पोस्ट केलेला हा फोटो सर्व सांगून जात आहे. तत्पूर्वी नेहा आणि रोहनप्रीत यांच्या लग्नाच्या फोटोनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला
होता.

हे देखील वाचा