Saturday, June 29, 2024

म्हणजे आम्ही येडे..!! नेहा कक्कर गरोदर नाहीच… मग तो फोटो? जाणून घ्या सत्य

आजकाल प्रमोशन आणि प्रसिद्धीसाठी हे बॉलिवूड कलाकार काय करतील याचा काही नेम नाही. शुक्रवारी नेहाने एक फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिने शेअर केला होता. ज्यात ती गरोदर असल्याचं दिसत होती सोबतच फोटोमध्ये तिचा पती रोहनप्रीत देखील होता. वाऱ्याच्या वेगाने नेहा कक्कर गरोदर असल्याच्या बातम्या पसरू लागल्या. लोक तिच्या गर्भारपणाबद्दल निरनिराळे तर्क वितर्क लावू लागले. आपणही याबद्दल विचार केलाच असेल की… पण जर थांबा नेहा ने स्वतःच या पब्लिसिटी स्टंटवरून आता पडदा उचलला आहे. होय आपण बरोबर वाचलंत हा सगळा एक पब्लिसिटी स्टंट होता. हा पब्लिसिटी स्टंट असल्याचं समजल्यावर नेटकरी मात्र नेहावर चांगलेच भडकले आहेत. काही जण तिला सुनावत आहेत तर काही जण तिचं समर्थन करताना दिसत आहेत.

शुक्रवारी नेहा कक्कर आणि तिचा नवरा रोहन प्रीत सिंह यांनी तो फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिलं, “ख्याल रख्या कर”. नेहाच्या गर्भारपणाच्या या फोटोवर पती रोहन आणि भाऊ टोनी यांनी केलेल्या कमेंटमुळे नेहा कक्कर गरोदर असल्याच्या बातमीला आणखीन बळ मिळालं. रोहनप्रीत ने या कमेंटमध्ये लिहिले की, “आता तूला जास्त काळजी घ्यावी लागेल, नेहू!” त्याचवेळी नेहाचा भाऊ टोनी कक्कर यानेही कमेंट बॉक्समध्ये मी मामा होणार असं लिहिलं. नेहाच्या पोस्टवरील पतीच्या आणि भावाच्या या प्रतिक्रियांमुळे लोकांना कन्फर्म झालं की नेहा गरोदर आहे. पण फोटोतील तिचं पुढे आलेलं पोट पाहून नेहा लग्ना आधीपासूनच गरोदर असल्याच्या बातम्याच जास्त पसरायला लागल्या.

कदाचित याच बातम्यांना पाहून आज शनिवारी नेहाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून त्याच फोटोचं एक पोस्टर चाहत्यांसोबत शेअर केलं. नेहा कक्कर आणि तिचा पती रोहनप्रीत सिंह या दोघांचं ‘ख्याल रख्या कर’ हे नवं गाणं येत्या २२ तारखेला युट्युबवर प्रदर्शित होणार आहे. त्यासाठी नेहाने केलेला हा सगळा खटाटोप होता. हे समोर आल्यानंतर आता मात्र लोकांनी नेहावर सडकून टीका करायला सुरुवात केली आहे. नेटकरी नेहाला गर्भारपणाची खिल्ली उडवल्याचं सांगत तिला ट्रोल करत आहेत तर काही जण तिच्या समर्थनार्थ बोलत आहे.

२४ ऑक्टोबर रोजी दिल्लीमध्ये रोहनप्रीत आणि नेहाचा लग्नसोहळा दिल्लीमध्ये पार पडला होता. लग्नाआधीच या दोघांनी लॉकडाऊन मध्ये लग्न करू या आशयाचं गाणं प्रदर्शित केलं होतं. आणि त्यानंतर लगेच दोघांच्या विवाहाच्या बातम्या समोर आल्या होत्या. आता या अशा पद्धतीने प्रेग्नन्सीच्या गाण्याचं प्रमोशन केल्या मुळे लोकं नेहाला आता गाणं आल्यानंतर आईसुद्धा होणार का असा एक वेगळाच प्रश्न देखील विचारत आहेत. पण यावरून आपल्याला एक गोष्ट मात्र कळाली असेल की हे बॉलिवूड सेलिब्रिटी प्रमोशनसाठी कुठल्या थराला जातील याचा काही नेम नाही.

हे देखील वाचा