Sunday, June 22, 2025
Home कॅलेंडर काय सांगता राव.! चक्क शो सुरू असतानाच ‘नेहा कक्कर’ला होऊ लागल्या उलट्या? वाचा नेमकं काय घडलं

काय सांगता राव.! चक्क शो सुरू असतानाच ‘नेहा कक्कर’ला होऊ लागल्या उलट्या? वाचा नेमकं काय घडलं

‘इंडियन आयडॉल’ या सुप्रसिद्ध ‘सिंगिंग रिऍलिटी शो’चं १२ वं पर्व नुकतंच रसिकांच्या भेटीला आलं. गेल्याच आठवड्यात या शोचा ऑडिशन राउंड पार पडला होता. यात परीक्षक होते विशाल दादलानी, नेहा कक्कर आणि हिमेश रेशमिया.!

या दरम्यान परिक्षकांमध्येही बऱ्याचदा धमाल मस्ती झाल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे. असाच एक मजा-मस्तीचा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

झालं असं की, परिक्षणाचं कार्य हे तसं इतकं सोपं अजिबात नसतं. खूप दमवणारं असतं. मग अशावेळी परीक्षकांना भूक देखील लागते. अगदी हेच नेहाच्या बाबतीत झालं. तिला भूक लागली. मग काय तिचा सहपरिक्षक हिमेश रेशमिया तिच्याकरिता पाणीपुरी मागवतो.

नेहाला त्यामुळे खूप आनंद झाला. तीने आनंदाच्या भरात पुरी तिखट पाण्यात बुडवली आणि खाल्ली. मात्र, दुसऱ्याच क्षणी ते तिने सेटवरच थुंकून टाकलं. कारण हे पाणी काही मिरची आणि पुदिन्यापासून बनलं नव्हतं तर या पाण्यात कडुलिंब आणि कारलं याचा रस मिसळला होता.

हे पाणी प्यायल्यानंर नेहा चा चेहरा मात्र बघण्यालायक झाला होता. तिच्या या चेहऱ्याकडे पाहून हिमेश आणि विशाल यांना हसू आवरत नव्हतं. यानंतर नेहाने स्पॉट दादांकडून केळी, पेस्ट्री असे पदार्थ मागवून तोंडाचा कडवट पण घालवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कडवटपणा इतका होता की तिला अगदी उलटी येऊ लागली होती.

नेहाने विचारल्यानंतर विशाल ने सांगितलं की, यात कारलं आणि कडुलिंब याचा रस होता. तर हिमेशचं म्हणणं होतं की ही पाणीपुरी फार पौष्टिक असून ती खास नेहासाठी बनवण्यात आली होती.

नेहा ही देखील एकेकाळी इंडियन आयडॉल या शोची स्पर्धक राहिली आहे. विशेष म्हणजे तेव्हा ती ह्या शोची विजेती बनू शकली नव्हती. असं असतानाही आज ती याच शोची परीक्षक आहे. हेच तिचं मोठं यश म्हणावं लागेल.

त्यामुळेच विशाल आणि हिमेश हे नेहासोबत अशी धमाल मस्ती नेहमीच करत असतात. या पर्वात सुद्धा आपल्याला हे तिघे परीक्षण करताना दिसणार आहेत. तर याहीपुढे आपल्याला अशीच मस्ती करताना हे तिन्ही परीक्षक दिसल्यास नवल वाटायला नको.

हे देखील वाचा