Sunday, May 19, 2024

नेहा कक्करने पहिल्यांदाच बनवला नवऱ्याच्या नावाचा टॅटू, भावूक झाला रोहनप्रीत

नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंगची जोडी चाहत्यांना खूप आवडत आहे. ‘रोहू’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या या जोडप्याचे प्रेमाने भरलेले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अप्रतिम गायिका नेहा अनेकदा तिचे प्रेम व्यक्त करत असते, पण पहिल्यांदाच तिने तिच्या हातावर तिच्या नवऱ्याच्या नावाचे टॅटू काढुन रोहनप्रीतला चकित केले आहे. भावूक झालेल्या रोहनप्रीतने नेहाला जगातील सर्वोत्तम पत्नी असेही म्हटले आहे.

नेहा कक्करने (Neha Kakkar) इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती टॅटू बनवताना दिसत आहे. नेहाने पहिल्यांदाच टॅटू बनवला आहे. टॅटू काढण्यादरम्यान, गायिका ‘आय लव्ह यू रोहू’ म्हणत ओरडत आहे. या व्हिडिओमध्ये पुढे दिसत आहे की, जेव्हा रोहनप्रीत (Rohanpreet Singh) नेहाला घेण्यासाठी पोहोचला तेव्हा नेहाने तिच्या हातावर रोहनप्रीतच्या नावाचा टॅटू दाखवून त्याला आश्चर्यचकित केले. शेवटी नेहा ‘आता माझ्यापासून कधीच दूर जाणार नाही ना’, असे म्हणताना दिसते. (neha kakkar made first tattoo on rohanpreet name)

नेहाने रोहनप्रीत सिंगला केले आश्चर्यचकित
नेहा कक्करच्या या स्टाइलवर रोहनप्रीत सिंग भावूक झाला. पत्नीच्या या प्रेमळ शैलीवर रोहनप्रीतने लिहिले, ‘तू सर्वोत्तम पत्नी आहेस…इस सारी दुनिया च तेरा वारगा कोई को ही नी सकदा. मी तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम करतो’. नेहाची गायक बहीण सोनू कक्करनेही प्रेम व्यक्त केले, तर भाऊ टोनी कक्करने ‘सर्वोत्तम मुलगी आणि सर्वोत्तम पत्नी’ असे लिहिले. नेहाच्या या प्रेमळ शैलीवर चाहते प्रेमाची उधळण करताना ‘खरे प्रेम’ही लिहित आहेत. या जोडप्यालाही आनंद मिळो ही प्रार्थनाही करत आहेत.

नेहा कक्करने रोहनप्रीतला दिले सरप्राइज
नेहा कक्कर अमेरिकेत शो करत होती, गायिका ब-याच दिवसांनी परतली आहे. घरी परतण्यापूर्वी, गायिकेने रोहनप्रीतला आश्चर्यचकित करण्याचा निर्णय घेत टॅटू बनविला. नेहा परतल्यावर रोहनप्रीतने पत्नीचे खुलेपणाने स्वागत केले.

‘रोहू’ एकमेकांवर आहे खूप प्रेम
व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी रोहनप्रीतने तिच्या हातावर नेहा कक्करचे नाव टॅटू करून तिला एक प्रेमळ सरप्राईज दिले. आता नेहाने त्याला सरप्राईज दिले आहे. २४ ऑक्टोबर २०२२ रोजी नेहा आणि रोहनप्रीतचे लग्न झाले.

हे देखील वाचा