Saturday, April 19, 2025
Home अन्य नेहा कक्करच्या बोल्ड लूकवर संतापले नेटकरी; म्हणाले, ‘बाई तुझा डिझायनर …’

नेहा कक्करच्या बोल्ड लूकवर संतापले नेटकरी; म्हणाले, ‘बाई तुझा डिझायनर …’

नेहा कक्कर (Neha Kakkar) एक प्रसिद्ध बॉलिवूड गायिका आहे, जी तिच्या क्यूट स्टाईलसाठी ओळखली जाते. नेहा तिच्या जादूई आवाजासाठी तर ओळखली जातेच त्याचबरोबर तिच्या स्टाईलमुळेही नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते.  ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. या सगळ्यामध्ये नेहाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये गायकाचा बोल्ड लूक पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. अनेकांनी नेहाला एक सल्लाही दिला आहे. 

वास्तविक, नुकतीच नेहा कक्कर मुंबईत एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी गायिका बोल्ड ड्रेस परिधान करताना दिसली. नेहाने एक लांब गुलाबी रंगाचा गाऊन घातला होता. या प्रसंगाचा एक व्हिडिओही समोर आला आहे. नेहा तिचा ड्रेस सांभाळत पुढे सरकत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. यादरम्यान, ती सर्व पापाराझींना पाहून स्मित हास्य देताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

नेहा कक्करच्या या व्हिडिओवर लोक मजेशीर कमेंट करत आहेत. अनेकांनी नेहाच्या लूकचे कौतुक  केले आहे, तर काही लोक तिच्य़ावर टिका करतानाही दिसत आहेत. एका यूजरने लिहिले, ‘पैसा बोलता है.’ तर आणखी एकाने  ‘नेहा दीदी तू तुझा ड्रेस डिझायनर बदल.’ असा सल्ला दिला आहे. त्याचप्रमाणे आणखी एका युजरने लिहिले की, ‘स्वस्त ड्रेस.’ तथापि, काही जणांना नेहा कक्कर प्रेग्रेंट असल्याचे वाटले. यासाठी त्यांनी कमेंटमध्ये नेहा कक्कर प्रेग्नंट असे लिहिले आहे. अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत. याशिवाय ज्यांना गायकाचा लूक आवडला त्यांनी हार्ट आणि इमोजीवर कमेंट केल्या आहेत. दरम्यान नेहा कक्कर सध्या सिंगिंग रिअलिटी शो ‘इंडियन आयडॉल 14’ ला जज करत आहे. नेहासोबत हिमेश रेशमिया आणि विशाल ददलानी हेही जजच्या भूमिकेत आहेत.

हेही वाचा – एआर रहमानच्या शिरपेचात मानाचा तुरा! मलेशियात झाला मोठा गौरव, जाणून तुम्हालाही वाटेल अभिमान
युजरने ‘बबिता’ला विचारली, एका रात्रीची किंमत किती? ‘का रे भ***व्या’ म्हणत अभिनेत्रीनेही शिकवला धडा
कलाविश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन, दोन दिवसापूर्वीच केला होता 50वा बड्डे साजरा

हे देखील वाचा