Friday, July 5, 2024

‘प्लॅनेट मराठी’चा पहिलाच चित्रपट लवकरच होणार प्रदर्शित; न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवलमध्ये झालीय निवड

सध्या कोरोनाची परिस्थिती पाहता राज्यात बऱ्याच ठिकाणी लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. त्यामुळे चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहणे प्रेक्षकांना शक्य होत नाही. अशा वेळी, मोठमोठे चित्रपट ओटीटीवर रिलीझ करण्यावर भर दिला जात आहे. प्रेक्षकांकडूनही ओटीटी प्लॅटफॉर्मला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. आता मराठी प्रेक्षकांसाठी प्रथमच मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आली आहे. ‘प्लॅनेट मराठी’ हे मराठीतील पहिले आणि एकमेव ओटीटी प्लॅटफॉर्म आहे.

गेल्या बऱ्याच दिवसांपासून ‘प्लॅनेट मराठी’ आपल्या आगामी वेबसीरिज आणि वेबफिल्मची घोषणा करताना दिसत आहे. मात्र, प्लॅनेट मराठीवर रिलीझ होणाऱ्या पहिल्या चित्रपटाचा मान ‘जून’ या आगामी चित्रपटाला मिळाला आहे. या चित्रपटात नेहा पेंडसे, सिद्धार्थ मेनन, किरण करमरकर, रेशम श्रीवर्धन आणि निलेश दिवेकर हे कलाकार प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहेत. निखिल महाजन यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे, तर याला जितेंद्र जोशी यांनी गीत दिले आहे. याशिवाय गायिका शाल्मली खोलगडे या चित्रपटात प्रथमच संगीतकार म्हणून काम करत आहे. सुहृद गोडबोले आणि वैभव खिस्ती दिग्दर्शित हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

विशेष म्हणजे ५१ व्या इफ्फी (इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल इंडिया) मधील इंडियन पॅनोरोमा या विभागात ‘जून’ चित्रपटाची निवड झाली होती. यासह पुणे फिल्म फेस्टिवल, केरळ फिल्म फेस्टिवल आणि त्यानंतर आता न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवलमध्येही जूनची निवड झाली आहे.

यासोबतच सर्वोत्तम अभिनयाच्या पुरस्कारामध्ये नेहा पेंडसे, सिद्धार्थ मेनन यांना नामांकन मिळाले आहे. तसेच मंगळवारपासून (18 मे) प्लॅनेट मराठी ओटीटीच्या अधिकृत वेबसाईटवर ‘जून’चा ट्रेलर प्रेक्षकांना पाहण्यासाठी उपलब्ध झाला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘वडिलांनाच मानले होते बॉयफ्रेंड’, नीना गुप्ता यांनी केला वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा

-खुशी कपूर झाली घराबाहेर स्पॉट अन् सगळीकडे होऊ लागली तिच्या वॉलपेपरची चर्चा, पाहून तुम्हीही व्हाल भावुक

-दगडाने संगीत वाजवत मुलाने ट्रेनमध्ये गायलं अरिजित सिंगचं गाणं; पाहा मन जिंकणारा व्हिडिओ

हे देखील वाचा