चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने अमाप प्रसिद्धी मिळवली आहे. मात्र, त्यांच्या लोकप्रियतेत आणखी भर घालण्याचं काम हे सोशल मीडियाने केले आहे. बॉलिवूडबाबत बोलायचं झालं, तर अनेक अभिनेते आणि अभिनेत्री सोशल मीडियावर जबरदस्त सक्रिय असतात. ते नेहमी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आपल्या आयुष्यातील गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. मात्र, कधी- कधी कलाकारांसोबत वाईट घटनाही घडताना दिसतात. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री अशा आहेत, ज्यांचे फोटो मॉर्फ (विचित्र पद्धतीने एडिट) केले गेले, ज्यामुळे अभिनेत्रींवर त्याचा परिणाम झाला. असेच काहीसे अभिनेत्री नेहा शर्माबाबतही घडले आहे. तिने नुकतेच सांगितले की, सन २०१८ मध्ये तिच्यासोबत घडलेल्या अशा घटनेमुळे तिला समस्यांचा सामना करावा लागला होता.
मॉर्फ फोटोंमुळे चिंतेत पडली होती अभिनेत्री
खरं तर, नेहाने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोच्या बॅकग्राऊंडसोबत छेडछाड करत एक सेक्स टॉय जोडण्यात आला होता. यानंतर तिचा हा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. त्यामुळे या फोटोवर वाईट कमेंटही आल्या होत्या. नेहाने सांगितले की, हे तिच्यासाठी खूपच दु:खद होतं. मात्र, त्यानंतर तिने यावर मात केली. तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला या फोटोबाबत तेव्हा समजले, जेव्हा ती ‘इलिगल’ चित्रपटाच्या सेटवर पोहोचली होती, तिथे सर्वजण तिच्यासोबत विचित्र पद्धतीने वागत होते. (Actress Neha Sharma Opened About Her Morphed Photo In 2018 Says People Were Behaving Strange On Set)
याबाबत पुढे बोलताना नेहाने सांगितले की, “मी या घटनेमुळे खूप चिंतेत होते. यार ही किती वाईट गोष्ट आहे. अशा फोटोंसोबत छेडछाड करणे किती चुकीचे आहे. मी किती लहान होते त्यावेळी. त्यामुळे माझे डोके आणखी खराब झाले. त्यावेळी मी हा विचार करत होते की, माझ्यासोबत असे का झाले? लोक माझ्यासोबत असे का करत आहेत? तुम्ही लोक असे घृणास्पद कृत्य कसे करू शकता?”
“मी सेटवर शूटिंगसाठी पोहोचली, तेव्हा सर्वजण माझ्यासोबत विचित्र व्यवहार करत होते. कोणीही माझ्याशी बोलत नव्हते. सर्वजण आपापसांत चर्चा करत होते. लोक अशाप्रकारे का बोलत आहेत, असे माझ्या मनात सुरू होते. मी चिंतेत होते, तेव्हाच एक व्यक्ती माझ्या जवळ आला आणि मला म्हणाला की, नेहा तुझा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.”
“मी विचारले की, कोणता फोटो? यानंतर जेव्हा मी फोटो पाहिला, तेव्हा माझे तोंड उघडेच राहिले. व्वा क्या बात है! ज्याने कोणी असे केले आहे. सुरुवातीला मी खूप उदास झाले. मात्र, त्यानंतर मी स्वत:ला सांगितले की, ठीक आहे. खरं काय आहे, ते मला माहित आहे. तसेच या गोष्टींकडे मला लक्ष देण्याची गरज नाही,” असे ती पुढे बोलताना म्हणाली.
दरम्यान अभिनेत्रीने सोशल मीडियावर त्यावेळी त्या व्यक्तीला चांगलेच फटकारले होते, ज्याने फोटोसोबत अशी छेडछाड केली होती. ती म्हणाली होती की, “फोटोंसोबत अशाप्रकारची छेडछाड करून बिघडणे बंद करा. हा माझा खरा फोटो आहे.”
It’s sad how misogynistic people can be..stop morphing pics and get cheap thrills out of it..this is the original pic.. pic.twitter.com/fmTqxtllYg
— Neha Sharma (@Officialneha) June 22, 2018
नेहाच्या कामाबाबत बोलायचं झालं, तर तिने ‘क्या सुपर कूल हैं हम’, ‘यमला पगला दीवाना २’ आणि ‘यंगिस्तान’, ‘तान्हाजी’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अंदमानातील सेल्युलर जेलला भेट देताना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल गौरवोद्गार काढत कंगना म्हणाली…
-कॅन्सरवर उपचार सुरु असताना महेश मांजरेकरांनी केले होते ‘अंतिम’चे शूटिंग,