सलमान खानचा लोकप्रिय रिऍलिटी शो ‘बिग बॉस 17’ दिवसेंदिवस अधिक रंजक होत आहे. शोच्या सुरुवातीपासूनच घरात भांडणे पाहायला मिळत आहेत. सध्या, काही स्पर्धकांना योग्य संबंध निर्माण करता आले नाहीत, तर काहींनी परस्पर शत्रुत्वाचा अवलंब केला आहे. टीव्ही अभिनेता नील भट्ट या शोमध्ये क्वचितच दिसतो. पण दरम्यान शांत नीलचे तापमानही वाढले आहे. त्याची झलक लेटेस्ट प्रोमोमध्ये पाहायला मिळते.
प्रोमोमध्ये नीलला घरातील इतर स्पर्धकांशी भांडताना दिसत आहे. तो त्यांच्यावर जोरदार टीका करतो आणि त्यांना टोमणे मारतो. नीलचा हा राग पाहून घरात खळबळ उडाली आहे. नीलचा राग का वाढला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण प्रोमोमधील त्याच्या वर्तनावरून तो खूप रागावला असल्याचे दिसून येते. नीलचा हा राग पाहून चाहते उत्सुक आहेत की पुढे काय होणार? नीलच्या या वर्तनामुळे घरात काय घडेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
‘बिग बॉस 17’च्या आगामी एपिसोडमध्ये शोमध्ये शांत स्वभावाचा नील भट्ट देखील संतापला आहे. अंकिता लोखंडेचा पती विकी जैन त्याच्या रागाचे कारण ठकला आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये अभिनेता विकी जैनसोबत भांडताना दिसत आहे. यावेळी नील इतका हायपर होतो की, इतर जण त्याच्यावर नियंत्रण ठेवत आहेत. दरम्यान, विकी पुन्हा असे काहीतरी बोलतो, ज्यामुळे नीलचा संयम सुटतो आणि अंकिताच्या नवऱ्याला मारण्यासाठी धावतो. आपल्या पतीला एवढा राग येताना पाहून ऐश्वर्यानेही हस्तक्षेप केला आणि त्याला रोखण्याचा प्रयत्न केला.
View this post on Instagram
नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा शोमध्ये आल्यापासून ते खूपच गोंधळलेले दिसत होते. ज्यानंतर बिग बॉसने त्याचा गोंधळ दूर केला आणि त्याला गेममध्ये सक्रिय राहण्याचा सल्ला दिला. यानंतर बिग बॉसने नीलला घरात आपले लक्ष्य कोण असेल याबद्दल विचारले. त्याला प्रत्युत्तर म्हणून त्याने अंकिता आणि विकीची नावे घेतली होती. आता नीलला राग कशाचा? याचा खुलासा प्रोमोमध्ये करण्यात आलेला नाही. पण या प्रोमोने हे सिद्ध केले आहे की, आजचा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे. (Neil Bhatt and Vicky Jain heated fight video of Ankita husband being beaten viral)
आधिक वाचा-
–ब्रेकिंग! भीम गीतांचा आवाज हरपला; प्रसिद्ध गायिकेचे दु:खद निधन
–‘वहिदा रेहमान यांना भूमिका द्या, त्यांना…’, अभिनेत्री निवेदिता सराफ यांचे मोठे विधान; एकदा वाचा