Friday, March 29, 2024

नील भट्ट-ऐश्वर्या शर्मा ट्रोलच्या निशाण्यावर, ट्रोलर्स म्हणाले ‘विक्टिम कार्ड खेळणे बंद करा’

‘स्मार्ट जोडी’ या नव्या रियॅलिटी शोचा शनिवारी (२६ फेब्रुवारी) प्रीमियर झाला. मनीष पॉल याने होस्ट केलेल्या, या शोमध्ये १० सेलिब्रिटी जोडपे आहेत जे आता अनेक मजेदार क्रियाकलापांमध्ये भाग घेताना दिसतील. पहिल्या एपिसोडमध्ये चार जोडप्यांची ओळख प्रेक्षकांना करून देण्यात आली. ज्यामध्ये नील भट्टऐश्वर्या शर्मा, भाग्यश्री-हिमालय दसानी, राहुल महाजन-नताल्या आणि मोनालिसा-विक्रांत सिंग राजपूत यांचा समावेश आहे. जेव्हा हे जोडपे त्यांची प्रेमकहाणी शेअर करत होते, तेव्हा सर्वांचे लक्ष ‘गुम है किसीके प्यार में’ फेम नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्माकडे वेधले गेले.

खर तर, एपिसोड दरम्यान नील भट्ट (Neil Bhatt) सोशल मीडिया ट्रोलिंगबद्दल देखील बोलला. नीलच्या म्हणण्यानुसार, ऐश्वर्या (Aishwarya Sharma) ‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेत नकारात्मक भूमिका करत असल्याने तिला अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. या जोडप्याने उघड केले की, ट्रोल्सने कसे गैरवर्तन केले आणि भूतकाळात ऐश्वर्यासाठी मृत्यूच्या प्रार्थनेबद्दल बोलले.

दरम्यान, ऐश्वर्याने शिवीगाळ केल्यामुळे तिने निलसोबत लग्न न करण्याचाही विचार केला होता. स्टार जोडप्याने केलेल्या दाव्यामुळे नेटिझन्स थोडेसे निराश झाले आहेत. या प्रकरणानंतर लगेचच अनेकांनी ट्विटरवर आरोप केला की, दोघे केवळ विक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक युजर्स या व्हिडिओबाबत टीव्ही जोडप्यावर नाराज असल्याचे दिसत आहे.

ऐश्वर्याने तिचा ट्रोलिंगचा वाईट अनुभवही सांगितला. तिचे म्हणणे आहे की, लोक तिला वाईट शिवीगाळ करायचे. ते तिला मृत्यूचा शापही देत असे. सोशल मीडिया ट्रोलिंगवर ऐश्वर्या शर्मा उघडपणे बोलण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत याबद्दल ती बोलली होती आणि ते तिच्यासाठी किती त्रासदायक झाले होते ते सांगितले होते. अभिनेत्रीने संभाषणात सांगितले होते की, तिच्या व्यक्तिरेखेमुळे लोक तिच्यावर कोणत्या प्रकारच्या कमेंट करतात, त्यामुळे ती खूप नाराज होते.

‘गुम है किसिके प्यार में’मध्ये पाखीची भूमिका साकारणारी ऐश्वर्या शर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. ऐश्वर्या शर्मा सतत तिचे व्हिडिओ शेअर करत राहते. या व्हिडिओंमध्ये ती अनेकदा दयाबेनची भूमिका साकारताना दिसते. अभिनेत्रीचे दयाबेनच्या रूपात पुन्हा पुन्हा दिसणे हे दर्शवते की, ती या भूमिकेबद्दल खरोखर प्रेरित आहे. ‘गुम है किसी के प्यार में’मध्ये नील आयपीएस विराटची भूमिका साकारत आहे.

हेही वाचा – 

हे देखील वाचा