लॉकडाऊन लागल्यापासून अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे आता प्रेक्षकांना घर बसल्या चित्रपट आणि वेबसीरिज पाहता येत आहेत. अशातच नेटफ्लिक्सने त्यांचा आगामी चित्रपट ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ या चित्रपटातील कलाकारांचा पहिला लूक प्रदर्शित केला आहे.
या सोबतच निर्मात्यांनी या चित्रपटातील मुख्य भूमिकेत असणाऱ्या कलाकारांची देखील घोषणा केली आहे. या चित्रपटात राधिका आपटे, हुमा कुरैशी, राजकुमार राव आणि सिकंदर खेर दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन वासन बाला करणार आहेत. त्यांनी याआधी हर्षवर्धन कपूर आणि राधिका आपटे यांच्या ‘स्पॉटलाईट’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
नेटफ्लिक्सने या चित्रपटातून मुख्य भूमिकेत असणाऱ्या कलाकारांचा पहिला लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. परंतु ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने या कहाणीचा बाबत जास्त खुलासा केला नाही. (Netflix share first look of Radhika Aapate and rajkumar rao from Monica o my darling)
तसेच अभिनेत्री राधिका आपटे हिने या चित्रपटातील बिहाइंड द सीन एक व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ शेअर करून राधिकाने लिहिले होते की, “सीन, सेट स्वॅग, सेट मोनिका, ओ माय डार्लिंग आता शूट होत आहे.”
या चित्रपटातील कास्टबाबत बोलायचे झाले, तर राजकुमार राव या आधी ‘रुही’ या चित्रपटात दिसला होता. तसेच राधिका आपटेने ‘रात अकेली है’ मध्ये काम करून खूप कौतुक मिळवले होते. हुमा कुरैशी मागील दिवसात ‘महारानी’ या वेबसीरिजमुळे खूप चर्चेत होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-