Friday, September 20, 2024
Home बॉलीवूड राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये 12th फेल चा समावेश का नाही ? सोशल मिडीयावर विलक्षण चर्चा…

राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये 12th फेल चा समावेश का नाही ? सोशल मिडीयावर विलक्षण चर्चा…

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाल्यानंतर 12th फेल’  या चित्रपटाला या यादीत का स्थान देण्यात आले नाही, असा प्रश्न सोशल मीडियावर सातत्याने उपस्थित केला जात आहे. ’12th फेल’ हा विक्रांत मॅसीसाठी करियर चेंजिंग चित्रपट म्हणून समोर आला. चित्रपटाला दमदार कथा आणि विक्रांतच्या अभिनय कामगिरीसाठी खूप प्रशंसा मिळाली.

७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अनेक चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले, ज्याची संपूर्ण यादी आता समोर आली आहे. ऋषभ शेट्टीला ‘कंतारा’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. ‘KGF 2’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटांनाही पुरस्कारांनी गौरविण्यात आले. ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या यादीत हिंदी चित्रपटांपेक्षा अधिक दाक्षिणात्य चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, या घोषणेनंतर ज्या चित्रपटाची सर्वाधिक चर्चा झाली तो चित्रपट म्हणजे 12th फेल’.

खरंतर हे पुरस्कार वर्ष २०२२ साठीचे पुरस्कार आहेत. २०२२ या वर्षात प्रदर्शित झालेल्या सिनेमांना यात गौरवण्यात आले आहे. डिसेंबर २०२२ मध्ये विक्रांत मॅसीच्या ’12th फेल’चे शूट संपले होते. या चित्रपटाला ६ ऑक्टोबर २०२३ रोजी त्याचे सेन्सॉर प्रमाणपत्र मिळाले आणि २७ ऑक्टोबर २०२३ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. २०२३ च्या चित्रपटांना पुढील वर्षी म्हणजेच २०२५ साली पुरस्कार देण्यात येतील. 

२०२३ मध्ये अल्लू अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. अल्लू अर्जुनला हा पुरस्कार त्याच्या ‘पुष्पा: द राइज’ चित्रपटासाठी मिळाला आहे. त्याचवेळी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार आलिया भट्टला ‘गंगूबाई काठियावाडी’साठी आणि क्रिती सेननला ‘मिमी’साठी मिळाला होता. हे सगळे चित्रपट २०२१ साली प्रदर्शित झाले होते. 

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा – 

बिग बॉस सदस्यांच्या डोळ्यांत आले पाणी; कुटुंबाशी झालेल्या संवादात सर्वजण भावूक…

 

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा