Sunday, September 8, 2024
Home टेलिव्हिजन बिग बॉस सदस्यांच्या डोळ्यांत आले पाणी; कुटुंबाशी झालेल्या संवादात सर्वजण भावूक…

बिग बॉस सदस्यांच्या डोळ्यांत आले पाणी; कुटुंबाशी झालेल्या संवादात सर्वजण भावूक…

बिग बॉस मराठीचा नवीन सिझन अनेक नवनवीन धमाके घेऊन येत आहे. सर्वच सदस्य चांगला खेळ करून आपलं सदस्यत्त्व राखण्याचा प्रयत्न करत आहेत. एरवी धिंगाणा घालणारे सदस्य आज मात्र इमोशनल झाले आहेत. बिग बॉसने सर्व सदस्यांना फोन करत आपापल्या कुटुंबाशी बोलायला सांगितले. आणि मग पुढे सर्वांच्या … अगदी सर्वांच्या डोळ्यात पाणी आले. 

बिग बॉसच्या नवीन प्रोमोत बघायला मिळत आहेत कि कसे सर्व सदस्य आपापल्या कुटुंबियांशी फोनवर बोलत आहेत. यात बोलताना जवळपास प्रत्येकाच्याच डोळ्यांत पाणी आलं आहे. वर्ष उसगावकर या त्यांच्या वडिलांच्या आठवणींत भावूक झाल्या आहेत. तर अंकिता मालवणी भाषेत रडत बोलत आहे की, तुझ्या वांगडा शेवटचा बोलायचा रावला रे. निक्की, घनश्याम, सुरज, अरबाज, यांच्याही डोळ्यांत पाणी दिसले. सुरज त्याच्या आईच्या आठवणीत भावूक झाला होता.

आज घरात कॅप्टन पदासाठी लढत बघायला मिळणार आहे. अरबाज पटेल, निक्की आणि सुरज हे सदस्य या पदासाठी लढताना दिसतील. घराचा नवीन कॅप्टन आजच्या भागात कळून येईल.   

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा – 

राज ठाकरे यांच्या जीवनावर बनणार बायोपिक; तेजस्विनी पंडीतच्या भूमिकेबाबत जोरदार चर्चा…

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा