Wednesday, March 4, 2026
Home बॉलीवूड ऐश्वर्याच्या ‘त्या’ छोट्याशा कृतीने जिंकली चाहत्यांची मने, व्हायरल व्हिडिओवर होतोय कौतुकाचा वर्षाव

ऐश्वर्याच्या ‘त्या’ छोट्याशा कृतीने जिंकली चाहत्यांची मने, व्हायरल व्हिडिओवर होतोय कौतुकाचा वर्षाव

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचे चाहते तिला बऱ्याच दिवसांनी चित्रपटाच्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. चार वर्षांनंतर ही अभिनेत्री ‘पोनियिन सेल्वम 1’ (PS1) चित्रपटातून पुनरागमन करणार आहे. हा चित्रपट 30 सप्टेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. मणिरत्नम दिग्दर्शित ‘PS1’ हा पॅन इंडिया चित्रपट आहे जो मोठ्या बजेटमध्ये बनला आहे. सध्या या चित्रपटाचे प्रमोशन जोरात सुरू आहे, ज्याचे फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. त्याचवेळी ऐश्वर्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामधील तिच्या छोट्याशा कृतीने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा (Aishwarya Rai) हा व्हिडिओ ‘पोनियिन सेल्वम 1’ च्या कार्यक्रमातील आहे. व्हिडिओमध्ये ती मणिरत्नम यांच्या शेजारी बसलेली दिसते आणि नंतर ती वाकून त्याच्या पायाला स्पर्श करते. मात्र, दिग्दर्शक तिला तसे करण्यापासून रोखतात. ऐश्वर्याच्या या स्टाइलचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. ऐश्वर्या राय मणिरत्नमला आपला गुरु मानते आणि यामुळेच ती पूर्ण आदराने त्यांचे पाय स्पर्श करताना दिसते.

तब्बल 500 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘PS1’ चित्रपटात ऐश्वर्या राय राजकुमारी नंदिनीची भूमिका साकारत आहे. अभिनेत्रीचे सौंदर्य वाढवण्यासाठी निर्मात्यांनी खूप पैसा खर्च केला आहे. कल्की कृष्णमूर्ती यांनी लिहिलेल्या त्याच नावाच्या तमिळ साहित्यिक कादंबरीवर आधारित ‘पोनियिन सेल्वन’ हा चित्रपट आहे. चित्रपटात चियान विक्रम, ऐश्वर्या राय बच्चन, त्रिशा, कार्ती आणि जयम रवी यांच्यासह अनेक स्टारकास्ट मुख्य भूमिकेत आहेत. सरथकुमार, शोभिता धुलिपाला, प्रकाश राज, ऐश्वर्या लक्ष्मी, प्रभू आणि लाल हे कलाकारही या चित्रपटात दिसणार आहेत.

ऐश्वर्या रायने मणिरत्नम यांच्या ‘इरुवर’ या चित्रपटातून सिनेविश्वात पदार्पण केले होते. मणिरत्नम यांच्या ‘गुरु’ आणि ‘रावण’ या चित्रपटात ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसली आहे. 2007 मध्ये ‘गुरू’ आणि 2010 मध्ये ‘रावण’ सिनेमागृहात रिलीज झाला होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा- ‘मी नग्न असताना अन् अंघोळ करताना त्यांनी मला पाहिलंय’, प्रसिद्ध गायिकेने कुणाविरुद्ध केला धक्कादायक खुलासा?
धक्कादायक! सनी लियोनीचे नाव वापरुन झाली फसवणुक, अभिनेत्रीने चाहत्यांना केली ‘ही’ विनंती
मानलं भावा तुला! रश्मिकापुढे शर्टची बटणे काढून चाहत्याने मागितला ऑटोग्राफ, लाजून लाल झाली अभिनेत्री

हे देखील वाचा