Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

TMKOC: नवीन दयाबेनच्या शर्यतीत ‘या’ अभिनेत्रीचा नंबर सर्वात वर, व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हो शो १३ वर्षांपासून प्रेक्षकांची पहिली पसंती आहे. चाहते या शोच्या प्रत्येक कलाकाराला खूप प्रेम व प्रतिसाद देतात. या शोमधील जेठालाल आणि दयाबेन यांची चर्चा अनोखीच असते.  जेठालालची पत्नी दयाबेनने शो सोडल्यापासून चाहते तिला मिस करत आहे. पण जर आपण शोमध्ये नवीन दयाबेनच्या एन्ट्रीबद्दल बोललो, तर एका अभिनेत्रीचे नाव सर्वात वर येत आहे आणि ती म्हणजे ‘गुम है किसी के प्यार में’मध्ये महत्वाची भूमिका साकारणारी पाखी.

‘गुम है किसी के प्यार में’मध्ये पाखीची भूमिका साकारणारी ऐश्वर्या शर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. ऐश्वर्या शर्मा रोज तिचे व्हिडिओ शेअर करत राहते. या व्हिडिओमध्ये ती अनेकदा दयाबेनची भूमिका साकारताना दिसते. अभिनेत्रीचे दयाबेनच्या रूपात पुन्हा पुन्हा दिसणे हे दर्शवते की, ती या भूमिकेबद्दल खरोखर प्रेरित आहे.

दयाबेन आणि पाखीची भूमिका
दयाबेन ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या कॉमेडी शोचे एक लोकप्रिय पात्र आहे आणि ती यामध्ये जेठालालची पत्नी आहे. दिशा वकानी या शोमध्ये दयाबेनची भूमिका साकारत होती. ती २०१७ च्या वर्षापासून शोमधून गायब आहे. आतापर्यंत तिच्या जागी दुसरी अभिनेत्री आली नाही आणि चाहते अजूनही तिची वाट पाहत आहेत. आजही दिशा वकानीच्या एपिसोड्सचे सीन ट्रेंड होत असतात. दुसरीकडे ‘गुम है किस के प्यार में’मध्ये पाखीची भूमिका साकारणारी ऐश्वर्या शर्मा शोमध्ये व्हँपची भूमिका साकारत आहे.

पाखी आणि विराटची प्रेमकहाणी
ऐश्वर्या शर्मा भलेही सई आणि विराटच्या आयुष्यात पाखीच्या रूपात हस्तक्षेप करताना दिसत असली, तरी खऱ्या आयुष्यात ती विराटसोबत आयुष्य घालवणार आहे. आता दोघांचा रोका झाला आहे आणि लवकरच ते लग्न करणार आहेत. एवढेच नाही, तर नील भट्टच्या प्रेमात असलेल्या ऐश्वर्या शर्माने तिच्या मनगटावर त्याच्या नावाचा टॅट्यू काढला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बॉलिवूडला ‘राम राम’ ठोकल्यानंतर, ‘दंगल गर्ल’ झायरा वसीमने प्रथमच शेअर केला तिचा फोटो

-शूटिंगच्या पहिल्याच दिवशी संजय मिश्रा यांनी दिले होते २८ टेक, अखेर कंटाळून दिग्दर्शकाने केलं ‘हे’ काम

-‘कसं काय पावनं बरं हाय का?’ मृण्मयीने शेअर केला आदिनाथसोबतचा दिलखेचक फोटो

हे देखील वाचा