Tuesday, July 9, 2024

आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या जीवनावर बनणार चित्रपट, तब्बल १५० देशांमध्ये होणार रिलीझ

आध्यात्मिक गुरू म्हणून श्री श्री रविशंकर जगभरात प्रसिद्ध आहेत. गुरुवारी (१३ मे) त्यांनी आपला ६५ वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने त्यांच्या जीवनावर लवकरच एक नवीन चित्रपट बनवला जाणार असल्याची अधिकृत घोषणाही करण्यात आली आहे. या चित्रपटाचे नावही जाहीर केले आहे.

श्री श्री रविशंकर यांच्या जीवनावर आधारित बनणाऱ्या चित्रपटाचे नाव ‘फ्री- द अनटोल्ड स्टोरी ऑफ गुरुदेव श्री श्री रविशंकर’ असे ठेवण्यात आले आहे. याची तयारी जोरात सुरू आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट जगभरातील १५० देशांमध्ये एकूण २१ भाषांमध्ये रिलीझ करण्याची योजना या चित्रपटाच्या निर्मात्यांनी बनवली आहे. तरीही चित्रपट बनवण्यासह चित्रपटात श्री श्री रविशंकर यांची भूमिका कोणता अभिनेता साकारणार याची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. तो बॉलिवूडचा प्रसिद्ध चेहरा असेल की, कोणता नवीन चेहरा हे अजून ठरलेले नाही.

चित्रपटाशी संबंधित एका सूत्राने एबीपी न्यूजशी बोलताना सांगितले की, “सध्या यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. चित्रपटाबाबत आणखी मोठे निर्णय घेणे बाकी आहेत. याबाबत निर्माते नंतर घोषणा करतील.” दुसरीकडे ‘फ्री- द अनटोल्ड स्टोरी ऑफ गुरुदेव श्री श्री रविशंकर’ चित्रपटात आध्यात्मिक गुरूंच्या आयुष्यातील सुरुवात पडद्यावर दाखवली जाईल. चित्रपटात श्री श्री रविशंकर यांच्या आध्यात्मिक गुरू बनणे आणि आध्यात्मिक कार्याने जगभरातील तमाम लोकांना प्रभावित करण्याची कहाणीला प्रामुख्याने दाखवले जाईल.

Photo Courtesy: Instagram/

कोण करणार दिग्दर्शन?
या चित्रपटाची निर्मिती महावीर जैन यांची कंपनी ‘सनडायल एन्टरटेन्मेंट’ आणि ‘लायका ग्रूप’ यांच्या संयुक्त विद्यमाने केली जाईल. ‘फ्री- द अनटोल्ड स्टोरी ऑफ गुरुदेव श्री श्री रविशंकर’ या चित्रपटाचे दिग्दर्शनाची जबाबदारी मॉन्टू बस्सी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यांनी या चित्रपटाच्या लेखनालाही सुरुवात केली आहे. सूत्राने एबीपी न्यूजला सांगितले की, “लॉकडाऊनचे निर्बंध संपल्यानंतर शूटिंग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल. तोपर्यंत चित्रपटाच्या निर्मितीशी निगडीत तयारीवर लक्ष दिले जाईल.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-…म्हणून मुलगा रणबीरसोबत नाही राहत नीतू कपूर, अभिनेत्रीने केला खुलासा

-रेमडेसिविरच्या ऐवजी एका व्यक्तीने घेतले रेमो डिसूझाचे नाव, त्यानेही शेअर केला मजेशीर व्हिडिओ; पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

-व्हिडिओ: १८ वर्षीय सुष्मिता सेनचा खास व्हिडिओ व्हायरल, अभिनेत्रीच्या अंदाजाने जिंकली चाहत्यांची मने

हे देखील वाचा