Sunday, May 19, 2024

व्हिडिओ: 18 वर्षीय सुष्मिता सेनचा खास व्हिडिओ व्हायरल, अभिनेत्रीच्या अंदाजाने जिंकली चाहत्यांची मने

बॉलिवूडची अभिनेत्री सुष्मिता सेन लाखों प्रेक्षकांच्या मनावर आजही राज्य करते. सुष्मिता बर्‍याच दिवसांपासून चित्रपटात दिसली नसेल, परंतु तिची प्रसिद्धी अजूनही कायम आहे. आर्या वेबसीरिजसह अभिनयात पुन्हा सुष्मिताने जोरदार पुनरागमन केले आहे. यादरम्यान 18 वर्षाची असतानाचा सुष्मिताचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सुष्मिता सेन (sushmita sen) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अभिनेत्री बर्‍याच दिवसांपासून आपल्या व्यावसायिक जीवनापेक्षा खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली आहे. अशातच अभिनेत्रीचा एक जुना व्हिडिओ समोर येत आहे. या व्हिडिओने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

सुष्मिता सेनचा संयुक्त राष्ट्रांच्या भाषणाची तयारी करतानाचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये १८ वर्षीय सुष्मिताच्या बाजूला आपल्याला बरीच पुस्तके दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये ती आपले भाषण लिहिण्यात व्यस्त आहे. यावेळी तिने ब्लेझर परिधान केलेले दिसत आहे. ज्यामुळे ती खुपच सुंदर दिसत आहे. क्लिपमध्ये सुष्मिताची एक मुलाखतदेखील दर्शविली गेली, ज्यात तिने कमी वयात बर्‍याच संधी मिळवण्याविषयी बोलले होते.

सुष्मिता म्हणाली की, ‘सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मी पुढे बघत आहे, ती म्हणजे यूएन. जर ते चांगले कार्य करत असेल, तर संयुक्त राष्ट्र संघटनेचे सक्रिय सदस्य होणे, हे एक मोठे काम आहे. कारण आता आणि आपल्या उर्वरित आयुष्यासाठी आपली इच्छा असेल, तर आपण त्यासाठी काम करू शकता.’

हा जुना व्हिडिओ पाहून चाहते वेगवेगळ्या कमेंट करून अभिनेत्रीचे कौतुक केले आहे. 18 वर्षीय सुष्मिताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांनाच आवडला आहे.

काही आठवड्यांपूर्वी सुष्मिताचा एक कविता वाचन करणारा आणखी एक व्हिडिओ ऑनलाईन समोर आला होता. त्यामध्ये सुष्मिताने सांगितले की, मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंतर तिने कविता लिहिली होती. या वाचनात असे म्हटले आहे की, ‘जर माझ्या सगळ्या दु: खातून आणि माझ्या अश्रूतुन ते सगळं जे मी एवढ्या वर्षात शिकले, जर कोणाची खाली गेलेली मान सन्मानाने उभारू शकते, काळोखाचे मन हलके करू शकते, तर मला विचार करायला हवा की, मानवजातीसाठी केलेली ही माझी सेवा आहे.’

मिस युनिव्हर्सचे विजेतेपद मिळविणारी पहिली भारतीय महिला ठरली, तेव्हा सुष्मिताने इतिहास रचला होता. 1994मध्ये ही स्पर्धा जिंकल्यानंतर, बॉलिवूडमध्ये तिने दमदार पदार्पण केले होते. सुष्मिताने ‘बीवी नंबर 1’, ‘मैं हूं ना’ आणि ‘मैंने प्यार क्यूँ किया’ यांसह अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2015 मध्ये तिने बॉलिवूडमधून ब्रेक घेतला होता. पण २०२० मध्ये ती आर्या वेबसीरिजसह अभिनयात परतली आहे. आता या मालिकेचा दुसरा भाग लवकरच चाहत्यांसमोर सादर केला जाईल.(special video of 18 year old sushmita sen went viral actress style will win your heart)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
शिव ठाकरेवर हाणामारीचा आराेप! सोशल मीडियावर हाेतेय शोमधून हाकालपट्टीची मागणी

सुष्मिता सेनला गिफ्टमध्ये कोणीच देऊ शकत नाही ‘डायमंड’, बॉयफ्रेंडही नाही; जाणून घ्या कारण

हे देखील वाचा