सध्या अनेक नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून त्याला प्रेक्षकांचाही जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. आता लवकरच आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, ज्याचा पोस्टर प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. केंद्र शासनाच्या अग्निपथ योजनेबद्दल युवकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने तयार होत असलेल्या ‘भारत के अग्निवीर’ या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा तसेच पोस्टरचे प्रकाशन राज्यपाल यांच्या हस्ते राजभवन येथे झाले. हा चित्रपट विविध भारतीय भाषांमध्ये तयार होईल.
केंद्र शासनाच्या #अग्निपथ योजनेबद्दल युवकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने तयार होत असलेल्या 'भारत के अग्निवीर' या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा तसेच पोस्टरचे प्रकाशन राज्यपाल @BSKoshyari यांच्या हस्ते राजभवन येथे झाले. हा चित्रपट विविध भारतीय भाषांमध्ये तयार होईल.#Agniveer pic.twitter.com/IDtJwFDQzo
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 22, 2022
काय आहे अग्रिपथ योजना –
सरकारने अग्निपथ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत 4 वर्षांच्या कार्यकाळासाठी तरुणांना सैन्यात भरती केले जाईल. 4 वर्षानंतर या तरुणांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. या योजनेंतर्गत निवड झालेल्या युवकांना अग्निवीर म्हटले जाईल. कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर यापैकी २५% अग्निवीरांना कायम केले जाईल. अग्निपथ भारती योजना 2022 अंतर्गत लष्कर, नौदल, हवाई दल आणि लष्कराच्या तिन्ही शाखांमध्ये भरती केली जाईल. दरवर्षी सुमारे 40 ते 45 हजार तरुणांना सैन्यात भरती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दरम्यान, ही योजना जाहीर झाल्यापासून त्याला मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. देशभरात अनेक ठिकाणी हिंसक निदर्शनेही देखील झाली आहेत.
हेही वाचा –
केतकी चितळेला उच्च न्यायालयाचा दिलासा, २२ गुन्ह्यांची एकत्रित FIR करण्याची मागणी मान्य
सुकेश चंद्रशेखर नंतर ‘या’ इटालियन अभिनेत्याच्या प्रेमात पडली जॅकलीन, व्हायरल व्हिडिओने रंगली चर्चा
म्हणून मी सारखी रडारडी करते! नेहा कक्करने स्पष्टच सांगितले