Wednesday, March 29, 2023

म्हणून मी सारखी रडारडी करते! नेहा कक्करने स्पष्टच सांगितले

नेहा कक्कर (Neha Kakkar) ही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय गायिकांपैकी एक आहे. नेहाने आपल्या सुमधुर आवाजाने सिनेसृष्टीत मोठी लोकप्रियता मिळवली आहे. नेहा जितकी तिच्या गाण्यांसाठी ओळखली जाते. तितकीच ती रिएलिटी शोमधील तिच्या परिक्षनासाठीही चांगलीच ओळखली जाते.नेहावर ती रिअलिटी शोमध्ये सारखी रडारड करत असल्याचा नेहमीच आरोप केला जातो. यावर आता पहिल्यांदाच तिने स्पष्टिकरण दिले आहे. 

नेहा कक्कर ही बॉलिवूडमधील सर्वात चर्चित सेलिब्रेटी म्हणून ओळखली जाते. नेहाने अनेक सुपरहिट गाण्यांना आपला आवाज देत मोठी लोकप्रियता मिळवली आहे. नेहा तिच्या स्टाईलिश आणि बोल्डलूकसाठीही विशेष प्रसिद्ध आहे.नेहा अनेक रियॅलिटी शोमध्ये परिक्षक म्हणून काम करतानाही दिसत असते. या कार्यक्रमांमध्ये ती अनेकदा भावूक होत रडताना दिसते ज्यामुळे तिला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केले जाते. नुकतेच नेहा कक्करने यावर स्पष्टिकरण दिले आहे.

याबद्दल बोलताना नेहाने सांगितले की, “मी अशा लोकांना काही उत्तर देऊ शकत नाही, कारण हे लोक अजिबात भावनिक नसतात. पण जे लोक दुसऱ्यांच्या भावनांचा विचार करतात ते मला समजुन घेतील. आज आपल्याला दुसऱ्यांना समजून घेणारे आणि त्यांना मदत करणारे लोक फारसे दिसत नाहीत, माझ्यात ते गुण आहेत आणि याबद्दल मला अजिबात खंत वाटत नाही.”

त्याचबरोबर नेहाने सांगितले की, “अनेक स्पर्धक असंंख्य अडचणींचा सामना करत इथपर्यंत आलेले असतात, त्यांचा संघर्ष ऐकून डोळ्यात पाणी आले तर त्यात काय वाईट आहे.”  दरम्यान, नेहाने आत्तापर्यंत इंडियन आयडॉल सारख्या गाजलेल्या रिअलिटी शोमध्ये परिक्षक म्हणुन काम केले आहे.

हेही वाचा –
‘राजपुत आहे झुकणार नाही’, म्हणताच भडकले विवेक अग्निहोत्री; म्हणाले, ‘आम्ही सगळे काय मोदींचे…’
ये भारत का तिरंगा है, झुकेगा नहीं! अल्लू अर्जुनची न्यूयॉर्कमध्ये डरकाळी, व्हिडिओ पाहून वाटेल अभिमान
मुलाचा वाढदिवस साजरा करताना भावूक झाली इरफान खानची पत्नी, व्हिडिओ शेअर करत सांगितला ‘हा’ किस्सा

हे देखील वाचा