Friday, December 13, 2024
[aioseo_breadcrumbs]

उर्वशी रौतेलाच्या अभिनयाला मिळाली गुरु रंधावाच्या सुरांची साथ! गाण्याला मिळतोय प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद

प्रसिद्ध गायक गुरु रंधावा आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला यांचे ‘डूब गये’ हे नवीन गाणे रिलीझ झाले आहे. हे गाणे रिलीझ होताच, चाहत्यांची बऱ्याच दिवसांची प्रतीक्षाही संपली. ‘डूब गये’ गाण्यात गुरु रंधावा आणि उर्वशी रौतेलाचा अतिशय रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. गाणे रिलीझ झाल्यानंतर, सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर याने धमाल करायला सुरुवात केली आहे.

गुरु रंधावा आणि उर्वशी रौतेला यांचे ‘डूब गये’ हे गाणे रिलीझ झाल्यानंतर, काही काळातच त्याला चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. या गाण्याचे शूट गोव्यासह वेगवेगळ्या ठिकाणी केले गेले होते. उर्वशी रौतेलाचा अप्रतिम अभिनय आणि गुरु रंधावाच्या मधुर आवाजाने या गाण्याला एका वेगळ्याच लेव्हलवर नेले आहे. दोघांची जोडी पुन्हा एकदा हिट ठरली आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

‘डूब गये’ गाण्याचे दिग्दर्शन रेमो रेमो डिसूजाने केले आहे, तर बी प्राक याने गाण्याचे बोल लिहिले आहेत. तसेच, गाण्याला टी-सीरिजच्या बॅनरखाली बनवण्यात आले आहे. गुरु रंधावा आणि उर्वशी रौतेला या दोघांचा हा दुसरा म्युझिक व्हिडिओ आहे. या अगोदर त्यांचे ‘मर जाएंगे’ हे गाणे आले होते. या गाण्याबद्दलही सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती. हे गाणेही प्रेक्षकांमध्ये बरेच लोकप्रिय झाले होते. या गाण्याला ५ तासातच ३८ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

उर्वशीने सनी देओलसोबत ‘सिंग साब द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिने ‘हेट स्टोरी 4’, ‘ग्रेट ग्रँड मस्ती’, ‘सनम रे’ सारख्या काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. या सर्व चित्रपटांमध्ये अभिनेत्रीचा मनमोहक असा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळाला. याशिवाय आता ती लवकरच तमिळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करणार आहे.

त्याचवेळी, गुरू रंधावाबद्दल बोलायचे झाले, तर तो त्याच्या ‘पटोला’, ‘हाय रेटेड गबरु’, ‘सूट सूट’, ‘इशारे तेरे’, ‘बनजा तू मेरी राणी’ आणि ‘लगदी लाहोर दी’ या लोकप्रिय गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे. गेल्या काही वर्षांत गुरु रंधावाने, पंजाबी संगीत उद्योगात आपल्या आवाजाने खास ओळख निर्माण केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मुलगी असावी तर अशी! ‘ताल से ताल मिला’ गाण्यावर युझवेंद्र चहलची पत्नी धनश्रीने लावले आईसोबत ठुमके, पाहा व्हिडिओ

-काय सांगता! अभिनेत्री अनुष्का शर्माने दिले होते आमिर खानच्या ‘या’ चित्रपटासाठी ऑडिशन; जुना व्हिडिओ व्हायरल

-‘नृत्याने अंधार आणि वेदनाविरुद्ध ल

हे देखील वाचा