Tuesday, July 9, 2024

ठरलं होतं मागच्या वर्षी, परंतू आता २०२१मध्ये मराठीतील ‘या’ जोड्याने करणार धडक्यात लग्न

नमस्कार मंडळी! गेल्या काही लेखांमध्ये आपण बॉलिवूड मधील प्रसिद्ध जोडप्यांबद्दल (ज्यांचे विवाह या नव्या वर्षात होणं अपेक्षित आहेत) वाचलं असेल. लॉकडाऊन आणि करोना व्हायरसमुळे अनेक सेलिब्रिटींनी आपले विवाह पुढे ढकलले होते. आजच्या या लेखात आपण मराठी सिनेसृष्टीतील अशा सेलिब्रिटी जोडप्यांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांचे विवाह या नव्या वर्षी होणार आहेत किंवा तशी शक्यता तरी आहे. अनेक मराठी सिलिब्रिटी जोडपी सध्या त्यांच्या लग्नाचं प्लॅनिंग पुन्हा नव्याने करत आहेत तर काही लग्नाआधी नातेवाईकांकडून, मित्रमंडळींकडून पार पाडल्या जाणाऱ्या केळवणामध्ये रमले आहेत. चला तर मग पाहुयात कोणत्या अश्या मराठी सेलिब्रिटीजच्या जोड्या आहेत ज्या यावर्षी अगदी गुढग्याला बाशिंग बांधून तयार आहेत.

सोनाली कुलकर्णी – कुणाल बेनोडेकर
सोनाली आणि कुणाल यांचा साखरपुडा फेब्रुवारी २०२० मध्ये पार पडला होता. सोशल मीडिया अकाऊंट्स वरून सोनालीने ही बातमी लॉकडाऊनच्या काळात आश्चर्यकारकरित्या सांगितली. सोनालीला तर आपण सगळे ओळखताच परंतु तिचा जो होणारा नवरा आहे कुणाल त्याच्याबद्दल असंख्य प्रश्न आपल्या मनात असतील. कुणाल हा एका महाराष्ट्रीयन कुटुंबात जन्माला आला असला तरी त्याचा जन्म हा इंग्लडमधला आहे. इंग्लंडमध्येच त्याने त्याचं प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं असून तो ब्रिटनमधल्याच एका आंतरराष्ट्रीय फॉरेन्सिक संस्थेसाठी चार्टर्ड अकाऊंटंट म्हणून काम करतोय. तर अशा या बहुचर्चित जोडप्याचं लग्न यावर्षी होणार असल्याच्या चर्चा आहेत.

मानसी नाईक – प्रदीप खरेरा
मानसी आणि प्रदीप हे दोघेही खरं तर २०२० मध्येच लग्न करणार होते परंतु करोना महामारीमुळे या दोघांनाही त्यांचं लग्न पुढे ढकलावं लागलं. एक सुप्रसिद्ध डांसर, अभिनेत्री आणि एक आंतरराष्ट्रीय बॉक्सर यांची प्रेमकथा आता पुढच्या टप्प्यावर जाणार आहे. यावर्षी म्हणजेच येत्या १९ जानेवारी २०२१ ला हे दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत. १८ तारखेला मेहंदी आणि संगीत सोहळ्याचं आयोजन केलं गेलं आहे. सध्या हे लव्हबर्ड्स लग्नाच्या धावपळीत व्यस्त आहेत.

सिद्धार्थ चांदेकर – मिताली मयेकर
मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि तितकीच सौंदर्यवती असलेली शिवाय बॉलिवूड आणि मराठी अशा दोन्ही चित्रपटांमध्ये काम केलेली मिताली मयेकर या दोघांनीही २४ जानेवारी २०१९ रोजी साखरपुडा उरकला होता. गेल्या वर्षी २०२० मध्येही दोघेही विवाह बंधनात अडकणार होते परंतु या महामारी मुळे त्यांनी आपला विवाह पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. यावर्षी हे जोडपं लग्न करण्याची दाट शक्यता आहे.

अभिज्ञा भावे – मेहुल पै

 

मराठी मालिका क्षेत्रातील एक मोठं नाव म्हणजे अभिज्ञा भावे! हीचा मागच्यावर्षी ऑक्टोबरमध्ये मेहुल पैसोबत साखरपुडा झाला. मेहुल हा व्यावसायिक असून त्याची स्वतःची मुंबईमध्ये इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे. यावर्षी हे दोघे विवाहबद्ध होण्याची दाट शक्यता आहे. सध्या हे दोघेही केळवणामध्ये व्यस्त आहेत

हे देखील वाचा