दिग्गज अभिनेते दिलीप कुमार रुग्णालयात दाखल, पत्नी सायरा बानो यांनी दिले त्यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट


कोरोनामुळे सगळीकडेच भयाण परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा वाईट परिस्थितीत बॉलिवूडलाही मोठया  प्रमाणात धक्का बसत आहे. नुकतेक रणधीर कपूर, हे कोरोनामुळे रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यातच अजून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, ती म्हणजे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत.

माध्यमांतील वृत्तानुसार, ९८ वर्षीय दिलीप कुमार यांची नियमित आरोग्य तपासणी केली जात आहे, आणि या कारणास्तव त्यांच्यावर योग्य देखरेख ठेवण्यासाठी रुग्णालयात दाखल केले गेले आहे. तसेच, दिलीपकुमार यांची पत्नी आणि दिग्गज अभिनेत्री सायरा बानो यांनी सांगितले की, त्यांची प्रकृती चांगली आहे, आणि रविवारी (२ मे) रुग्णालयातून सोडण्यात येणार आहे.

सायरा बानो यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की, “दिलीप कुमार साहेबांची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली आहे, आणि रविवारी त्यांना घरी सोडण्यात येईल.” गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दिलीप कुमार, यांनी कोव्हिडमुळे आपला वाढदिवस साजरा केला नव्हता. त्याचबरोबर सायरा बानो यांनी दरवर्षीप्रमाणे या निमित्ताने गरजू लोकांना दान केले होते.

दिलीप कुमार यांनी प्रत्येकासाठी प्रार्थना करत ट्वीट केले होते की, ते सर्वांसाठी प्रार्थना करत आहे, आणि लवकरच आपण सर्वजण या विषाणूपासून मुक्त होऊ.

दिलीप कुमार हे बरेच दिवस सोशल मीडियावर सक्रिय नाहीयेत. त्यांनी शेवटचे ट्वीट २६ मार्च रोजी केले होते. गेल्या वर्षी कोव्हिडची सुरुवात झाली, तेव्हा सायरा बानो यांनी दिलीपकुमार यांची काळजी घेण्यासाठी, सगळ्यांपासून त्यांना दूर केले होते. तेव्हापासून सायरा बानो या दिलीप कुमार यांची संपूर्ण काळजी घेत आहेत.

एका मुलाखतीत सायरा बानो म्हणाल्या होत्या की, “दिलीप कुमार त्यांच्यासाठी काळजाचा तुकडा आहे.” सायरा बानो म्हणाल्या होत्या, “मी आजही दिलीप साहेबांची नजर उतरवत असते. दिलीप साहेब माझ्यासाठी माझ्या हृदयाचे ठोके आहेत. दिलीप साहेबांना स्पर्श करणे, आणि त्यांच्याकडे सतत बघत राहणे हा माझ्यासाठी जगातील सगळ्यात मोठा आनंद आहे. मी त्यांना आयुष्यभर असे पाहू शकते. ते माझा श्वास आहेत.”

सायरा बानो काही दिवसांपूर्वी म्हणाल्या होत्या की, “त्या दिलीप कुमार यांची काळजी यासाठी घेत नाही की, त्यांच्यावर काही दबाव आहे. त्या काळजी यासाठी घेतात की, त्यांचे दिलीप कुमार यांच्यावर खूप प्रेम आहे.”

सायरा पुढे म्हणाल्या, “आजकाल दिलीप कुमार खूप अशक्त आहे. त्यांची प्रतिकारशक्ती देखील खूप कमी आहे. बर्‍याच वेळा ते हॉलमध्ये येतात, आणि नंतर परत खोलीत जातात. त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-काळीज तोडणारी बातमी! अभिनेत्री स्नेहा वाघच्या वडिलांचे निधन, पोस्ट शेअर करत दिली माहिती

-कोरोना काळात औषधांचा काळा बाजार करणाऱ्यांवर संतापला अभिनेता आर माधवन; म्हणाला…

-‘कपडे काढ, मग कळेल तू भूमिकेसाठी योग्य आहेस की नाही!’ ग्लॅमरच्या विश्वाबद्दल अभिनेत्रीने केला मोठा खुलासा


Leave A Reply

Your email address will not be published.