गेल्या वर्षांपासून कोरोना विषाणूचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे आणि अजूनही त्याचा हाहाकार सुरूच आहे. या महामारीमुळे सगळ्याच बाजूने नुकसान होताना दिसत आहे. बाहेर परिस्थिती अतिशय वाईट असल्याने, लोक आपापल्या घरात बसलेले बघायला मिळत आहेत. काही लोक नाईलाजाने, तर काही लोक भीतीने आपल्याच घरात आहेत. अशा या वातावरणात सुद्धा काही कलाकार आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसत आहेत. जेणेकरून लोकांनी या काळात पण आनंदी असायला हवे.
प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांनी एक गोंडस व्हिडिओ शेअर केला आहे. ते चाहत्यांना सांगत आहेत की, ते दुःखावर मात करण्यासाठी काय करतात.
Badte coronavirus ki khabar sun kar mun udas ho jaata hai…. to yahan chala aata hoon. Please please take care ???? pic.twitter.com/3gQ0fioQ9N
— Dharmendra Deol (@aapkadharam) April 13, 2021
धर्मेंद्र यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी व्हिडिओ शेअर करत लिहिले, “वाढत्या कोरोना विषाणूची बातमी ऐकून मन उदास होते, म्हणून मी येथे जातो. कृपया काळजी घ्या.” व्हिडिओमध्ये धर्मेंद्र हे गाय आणि तिच्या बछड्यावर प्रेम करताना दिसत आहेत. धर्मेंद्र हे त्यांचे कुटुंब असल्याचे सांगत आहेत, ते येथे आल्यामुळे खूप आनंदी आहेत. हे खरे आहे की, निसर्ग आणि प्राणी यांच्यासोबत वेळ घालवणे चांगले आहे.
धर्मेंद्र यांच्या चाहत्यांना त्यांचा हा व्हिडिओ खूप आवडला आहे. चाहत्यांसोबतच अनेक कलाकारांनीही या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
धर्मेंद्र हे एक असे अभिनेते आहेत, ज्यांना निसर्गावर आणि पाळीव प्राण्यांमध्ये वेळ घालवायला खूप आवडते. त्यांना शेती देखील खूप आवडते. ते आपल्या फार्महाऊसमध्ये भाजीपाला पिकवतात, आणि चांगले आयुष्य जगत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-नवं गाणं, नवा धमाका! खेसारी लाल यादवच्या नुकत्याच रिलीझ झालेल्या गाण्यावर पडतोय हिट्सचा पाऊस