Friday, April 19, 2024

आधी भांडण मग माफी! अभिनेत्री निया आणि देवोलीनामधील वाद अखेर निवळला, पर्ल पुरीबाबत झाला होता वाद

नुकतेच काही दिवसांपूर्वी टीव्ही अभिनेता पर्ल पुरी याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या बाबत अनेकांनी त्यांचे मत मांडले आहे. परंतु त्यांचे मत मांडताना दोन अभिनेत्रींमध्ये भांडण जुंपले. त्यांनी एकमेकींना चांगले वाईट ऐकवले. मात्र, यानंतर त्यांनी एकमेकींची माफीही मागितली आहे.

त्या दोन अभिनेत्री म्हणजेच देवोलीना भट्टाचार्जी आणि निया शर्मा. या दोन्ही अभिनेत्रींमधील ट्विटर‌ वाद खूप चर्चेत आहे. पर्ल पुरी याला अटक झाल्यानंतर या दोघींनी केलेल्या ट्विटनंतर त्यांच्यातील वाद खूपच वाढला. पर्ल पुरी याच्यावर त्याने 2019 मध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्याला 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. निया शर्मा पर्ल पुरीला सपोर्ट करत आहे, तर देवोलीना त्या मुलीला शिव्या शाप देणाऱ्या लोकांना विरोध करत आहे. याच दरम्यान त्या दोघी एकमेकींविरुद्ध ट्वीट करू लागल्या होत्या.

नियाने ट्वीट करून लिहिले होते की, “दीदीला कोणीतरी सांगा कँडल मार्च नाही करू शकत, आता महामारी चालू आहे. यासोबतच दीदीला ते बकवास डान्स व्हिडिओ बनवण्या‌ आधी सराव करण्याची गरज आहे. तिला असे वाटत आहे की, ती खूप छान करत आहे.”

Didi ko koi bata do dharna and candle march nahi kar sakte pandemic hai abhi bhi.
Also Didi needs to practice her dance before she makes those pathetic dance reels thinking she’s nailing them.

— NIA SHARMA (@Theniasharma) June 7, 2021

यावर देवोलीनाने उत्तर दिले होते की, “कृपया छोटीला कोणीतरी सांगा फक्त फॅशन स्किल असल्याने कोणी चांगला व्यक्ती होत नाही. त्यासाठी चांगले विचार आणि चांगल्या मनाची गरज असते. आणि मी माझे रिल चांगले बनवत आहे की नाही हे माझ्या चाहत्यांना ठरवू देत. तू इथे पण परीक्षक झाली. यापेक्षा तू तुझ्या फोटोशूटवर लक्ष दे.”

Please Choti ko koi bato do sirf fashion skills dikhane se koi insaan nahi banta hai.Acchi soch aur acche dil ki zarurat hoti hai jiski kami dikh rahi hai.And whether i nailed my reels or no let my fans decide.Yahan pe bhi judge ban gayee.Rather focus on your photoshoots.

— Devoleena Bhattacharjee (@Devoleena_23) June 7, 2021

यापुढे तिने लिहिले होते की, “माझे ट्वीट त्या लोकांसाठी आहे. जे त्या सात वर्षांच्या छोट्याश्या मुलीला बोलत आहेत. तिच्यावर आरोप करत आहेत. तिला गोल्ड डिगर म्हणत आहेत, मग छोटीला का मिर्ची लागली. का ती देखील त्याच लोकांप्रमाणे आहे जे कलम वाचून सोडून देतात. कोणत्याची घटनेची सत्यता पडताळत नाहीत.”

देवोलीनाने 6 जूनला एक ट्वीट केले होते. यामध्ये तिने पर्ल पुरीच्या केसमध्ये अल्पवयीन मुलीच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांविरोधात लिहिले होते. यानंतर पर्ल पुरीला अटक झाल्यानंतर निया शर्माने ट्वीट केले होते की, या अशा महिलांना किंवा मुलींना लगेच कॅज्युअल बनवू नका उद्या जाऊन याच मोठं संकट उभं करू शकतात. यासोबत तिने सांगतले होते की, पर्ल पुरीला तिचा पूर्ण सपोर्ट आहे.

यानंतर आता या दोन्ही अभिनेत्रींनी एकमेकांची माफी मागितली आहे. एकमेकींना केलेले ट्वीटही त्यांनी डिलीट केले आहेत.

देवोलीना आणि नियाने मागितली एकमेकींची माफी
देवोलीना आणि नियाने झालेल्या भाडणानंतर इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत माफी मागितली आहे. नियाने लिहिले आहे की, “माझी आई, भाऊ आणि रवीने मला सांगितले की, हे ठीक नव्हते. जवळचे ३ व्यक्ती चुकीचे असू शकत नाहीत. देवोलीना मी तुझी माफी मागते. मी आपली मर्यादा ओलांडली आणि वैयक्तिक पातळीवर आले. ते रागाच्या भरात झाले. अपेक्षा करतो की, तू विसरशील.”

यानंतर नियाची स्टोरी शेअर करत देवोलीनाने लिहिले की, “हरकत नाही निया. मलाही माफ कर, जर मी तुला वाईट बोलले असेल तर. माझा असा कोणताही हेतू नव्हता. आई, भाऊ आणि रवी यांना माझे प्रेम दे. सुरक्षित राहा आणि काळजी घ्या.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा