टेलिव्हीजन अभिनेत्री असलेली निया शर्मा (Nia Sharma) तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमुळे सतत चर्चेत असते. निया शर्माने तिची इमेज एक बोल्ड अभिनेत्री म्हणूनच तयार केली आहे. बोल्ड फोटो, व्हिडिओ यांमुळे नित्य सतत सोशल मीडियावर गाजताना दिसते. निया अनेकदा तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे ट्रोल देखील होताना दिसते. निया आणि नियाच्या पोस्ट नेहमीच तिला मीडियामध्ये प्रकाशझोतात आणतात. नुकताच नियाने तिचा एक नवीन व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती जिममध्ये व्यायाम करताना दिसत आहे.
निया या व्हिडिओमध्ये कॅमेऱ्याकडे पाठ करून बसलेली दिसत असून, ती जिममध्ये पुल अप्स करत आहे. तिचा जिम ट्रेनर देखील तिला अधिक मेहनत करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. नियाने हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, “मी जिममध्ये कधीच येऊ इच्छित नव्हते. मात्र जेव्हापासून मी हे करायला सुरुवात केली आहे, मला आवडत आहे.” नियाचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून, त्यावर नेटकरी देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहे.
नियाने हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर काही काळातच ४० हजारांपेक्षा अधिक लाईक्स आले आहेत. याशिवाय या व्हिडिओवर असंख्य कमेंट्स देखील आल्या असून तिला फॅन्स हार्ड वर्किंग गर्ल, अनस्टॉपेबल, सुपर, खूबसूरत, ऑसम, ब्यूटीफुल, नाइस, किप इट अप असे म्हणताना दिसत आहे. नियाने या व्हिडिओमध्ये गुलाबी रंगाचा जिम ड्रेस घातला आहे. याआधी देखील नियाने शेअर केलेल्या पोल डान्सच्या व्हिडिओला फॅन्सने तुफान प्रतिसाद दिला होता.
नियाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, काही दिवसांपूर्वीच तिचा ‘फूंक ले’ हा म्युझिक अल्बम प्रदर्शित झाला. या गाण्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. या गाण्यात देखील नियाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला होता. नियाने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. ‘वे एक हजारों में मेरी बहना है’, ‘इस प्यार को क्या नाम दूं’, ‘जमाई राजा’, ‘पवित्र रिश्ता’, ‘कुबूल है’, ‘आप के आ जाने से’, ‘नागिन 3’, ‘नागिन 5’ याशिवाय ती जमाई राजा २.० मध्ये देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसली होती.
हेही वाचा