×

निया शर्माने ‘चोली के पीछे क्या है’ गाण्यावर केला डान्स, परफॉर्मन्स पाहून चाहते म्हणाले ‘फायर’

टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मा इंडस्ट्रीत तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमरस लूकसाठी ओळखली जाते. ती अनेकदा तिच्या बोल्ड फोटोंमुळेही चर्चेत असते. सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेली ही अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी देखील शेअर करते. ती सतत तिचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते, ज्यामुळे ती चर्चेचा भाग बनते. नियाला डान्सची खूप आवड आहे, त्यामुळे ती तिच्या या कौशल्यात सतत भर घालत राहते. निया सोशल मीडियावर तिचे डान्स व्हिडिओ देखील शेअर करत असते. यावेळी नियाने तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो पोस्ट होताच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओतील नियाच्या मूव्ह्ज पाहून चाहते वेडे झाले आहेत.

नियाने (Nia Sharma) तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती माधुरी दीक्षितच्या ‘चोली के पीचे क्या है’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या गाण्याचे हे रिमिक्स व्हर्जन आहे. नियाचे डान्सिंग स्टेप्स पाहून सगळेच हैराण झाले आहेत. नियाच्या डान्स व्हिडिओवरून चाहत्यांची नजर हटत नाही. चाहते तिच्या या व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव करत आहे.

View this post on Instagram

A post shared by Nia Sharma (@niasharma90)

नियाच्या पोस्टवर आल्या कमेंट्स

व्हिडिओमध्ये नियाने काळ्या पँटसह पिवळा टॉप परिधान केलेला दिसत आहे. नियासोबत आणखी दोन मुली डान्स करत आहेत. नियाच्या पोस्टवर चाहते खूप कमेंट करत आहेत. एका चाहत्याने लिहिले की, “ओये होये.” फायर इमोजी देखील शेअर केले आहेत. त्याचवेळी, आणखी एका चाहत्याने हार्ट इमोजी शेअर केले आहेत.

निया शिकली पोल डान्स 

निया शर्माला डान्सची खूप आवड असल्याने ती गेल्या काही दिवसांपासून ती पोल डान्स शिकत आहे. तिने पोल डान्स करतानाचे अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. नियाने नुकत्याच  शेअर केलेल्या डान्स व्हिडिओमध्ये ती पोल डान्स करताना दिसत आहे. निया अनेक कठीण स्टेप्स करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

हेही वाचा :

 

Latest Post