Monday, July 1, 2024

अभिनेत्रीच्या लोकप्रियतेने गाठले शिखर! इंस्टाग्रामवर ओलांडला ६ मिलियन फॉलोवर्सचा टप्पा, व्हिडिओ शेअर करत मानले चाहत्यांचे आभार

अभिनेत्री निया शर्मा ही आपल्या बोल्ड अंदाजासाठी सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय आहे. टेलिव्हिजन दुनियेतील निया ही बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. आपले अनेक हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करून ती चाहत्यांना नेहमीच सरप्राईझ देत असते. सोशल मीडियावर तिचे फोटो खूपच वेगाने व्हायरल होत असतात. अशातच आता नियाचे इंस्टाग्रामवर सहा मिलियन फॉलोवर्स झाले आहे. या निमित्ताने तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये नियाने एका इंग्रजी गाण्यावर जोरदार ठुमके लावले आहेत. या व्हिडिओमध्ये तिचे डान्स मुव्हज देखील शानदार आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने हार्ट आणि स्माईल ईमोजीसह लिहिले की, “या 6 मिलियनमधून मला माझा नवीन रस्ता शोधायचा आहे, सगळ्यांचे आभार!!” नियाने या व्हिडिओमध्ये ‘यू कॅन टेल मी’ या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे.

या व्हिडिओमध्ये तिने लाल रंगाचा क्रॉप टॉप आणि काळ्या रंगाचे शॉर्ट्स घातले आहेत. तसेच केस मोकळे सोडले आहेत. ती या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. सर्व प्रेक्षक तिचे खूपच कौतुक करत आहेत.

निया नेहमीच आपले बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करत असते. त्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. मागील काही दिवसात तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत देखील ती खूप चर्चेत होती. ती राहुल सुधीर याच्यासोबत डेट करत आहे, अशी चर्चा सर्वत्र पसरली होती. पण याबाबत त्या दोघांनी देखील काहीच सांगितले नाही. नियाने नुकताच ‘जमाई राजा 2.0’ या मुलाखतीत तिच्या करिअरसोबत वेब सीरिजमध्ये दिलेल्या बोल्ड सीनबद्दल देखील चर्चा केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-माणुसकीचे उत्तम उदाहरण! मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतने दिले घुबडाला जीवनदान; सर्वत्र होतंय कौतुक

-हॉटेल रूममध्ये एकटीच असलेली सनी लिओनी अचानक मारू लागली बेडवर उड्या; चाहत्यांकडून व्हिडिओला मिळतंय भरभरून प्रेम

-भल्या भल्यांना रडवणाऱ्या कंगना रणौतला ‘या’ कारणामुळे अश्रू अनावर

हे देखील वाचा