Tuesday, July 9, 2024

ट्रोल झाल्याने दुखावलीय निया शर्मा, टोमण्यांना कंटाळलेल्या अभिनेत्रीने ट्रोल करणाऱ्यांना दिले चोख उत्तर

निया शर्मा (Nia Sharma) टीव्हीच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये गणली जाते. चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी खूप उत्सुक असतात. निया शर्माने छोट्या पडद्यावर ‘एक हजारों में मेरी बहना है’ या मालिकेतून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. ती तिच्या ग्लॅमरस स्टाइलमुळे सतत चर्चेत असते. नियाचा फॅशन सेन्स पूर्णपणे वेगळा आहे. मात्र तिला अनेकदा तिची बिनधास्त स्टाईल आणि सिझलिंग लुकमुळे टोमणे ऐकवली जातात. कधीकधी तिला तिच्या स्टाईल स्टेटमेंटसाठी खूप ट्रोल केले जाते. पण निया तिच्या सकारात्मक अंदाजाने ट्रोलर्सना चांगलेच तोंड जाते.

अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान निया शर्माने खुलासा केला की, ती या सर्व परिस्थितींना कशी सामोरे जाते. निया शर्माचा इन्स्टा बायो पाहून तुम्ही अंदाज लावू शकता, की ती किती मस्त आहे. नियाच्या इंस्टाग्राम बायोवर नजर टाकली, तर त्यात लिहिले आहे, ‘चला मुद्द्यावर येऊ या. प्लिज. प्रिटी.’ त्याचबरोबर अभिनेत्रीचा ट्विटर बायो बघितला तर त्यात लिहिले आहे, ‘खूपच जास्त कुरूप… फॅशन सेन्सचा अभाव आहे… हॅम… कॉन्गर्ल.’ (nia sharma opened up about being judge on dressing sense)

जेव्हा निया शर्माला विचारण्यात आले की, या अनोख्या सोशल मीडिया बायोमागील रहस्य काय आहे? तर निया याविषयी म्हणाली की, “बायोमध्ये तेच आहे, जे सर्व लोक बोलतात. म्हणूनच लोकांना जे जास्त ऐकायला आवडते, तेच मी बायोमध्ये सुद्धा लिहिते.” नियाने सांगितले की, “लोक मला फॅशन डिझास्टर म्हणतात, तसेच मला कुरूप आणि बरेच काही म्हणतात.”

निया शर्मा शेवटची Zee5 ची वेब सिरीज ‘जमाई राजा २.०’ मध्ये दिसली होती. या शोमध्ये ती रवी दुबेसोबत दिसली होती. या वर्षाच्या सुरुवातीला तो फूनक या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा