Monday, July 15, 2024

निया शर्माने क्रॉप शर्टचे बटन उघडी ठेवत केलेल्या बोल्ड आणि मादक फोटोशूटने इंटरनेटवर घातला गोंधळ

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वात बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री कोण? असा प्रश्न कोणी विचारला तर सर्वात आधी नाव येणार अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma) हिचे. नियाने तिच्या सध्या, सोज्वळ अभिनेत्रीची चौकट मोडत नियाने बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून स्वतःची नवीन ओळख निर्माण केली आहे. निया सतत तिच्या सोशल मीडियावर तिचे बोल्ड आणि मादक फोटो पोस्ट करत असते. याचमुळे निया सतत मीडियामध्ये आणि फॅन्समध्ये चर्चेचा विषय बनत असते.

नुकतेच नियाचे ‘फूंक ले’ (Phoonk Le) हे नवीन कोरे गाणे प्रदर्शित करण्यात आले असून, ती सध्या या गाण्याच्या प्रमोशनमध्ये खूपच व्यस्त आहे. असे असूनही ती तिचे सोशल मीडिया अपडेट केल्याशिवाय राहत नाही. कामात कितीही बिझी असली तरी निया तिच्या फॅन्ससाठी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहून त्यांच्यासाठी पोस्ट शेअर करताना दिसते.

निया तिच्या हॉट फोटोज आणि व्हिडिओमुळे नेहमीच इंटरनेटवर गोंधळ घालताना दिसते. तिचे सेन्शुअस फोटो आणि हॉट व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. नुकतेच नियाने तिचे बोल्ड फोटो शेअर केले असून, या फोटोंमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला असून, त्या शर्टचे वरचे बटन उघडे ठेवले आहेत, ज्यांमुळे ती अधिकच मादक दिसत आहे. तिचे या लूकमधील ब्लॅक अँड व्हाईट फोटो सध्या इंटरनेटवर खूपच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा क्रॉप शर्ट आणि ब्लॅक जीन्स घातली असून, या लुकला अधिक मादक बनवण्यासाठी तिने वरचे बटन उघडे ठेवले आहे. यातल्या दुसऱ्या फोटोमध्ये ती तिचा कमनीय बांधा फ्लॉन्ट करत आहे. तिचे या फोटोंवर फॅन्स भरपूर कमेंट्स करत असले तरी काहींना तिचा हा लूक काही आवडलेला दिसत नाही.

निया ‘फूंक ले’ गाण्याच्या प्रमोशनसाठी बिग बॉस च्या सेटवर देखील पोहचली होती. याशिवाय तिने काही रिक्षावाल्यांसोबत देखील डान्स केला होता जो इंटरनेटवर खूपच गाजला.

हेही वाचा :

हे देखील वाचा